मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

cm

औरंगाबाद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. हा सोहळा पार पडल्यानंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. या कार्यक्रमात केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जोरदार … Read more

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्रांकडून मराठवाड्याला ‘आठ’ मोठे गिफ्ट

cm

औरंगाबाद – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद दौऱ्यात मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना राज्यातील जनतेच्या वतीने अभिवादन केल्यानंतर भाषण करताना त्यांनी मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा केली. तसंच निजामकालीन १५० शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मराठवाड्यासाठी योजनांचा पाढा वाचवून दाखवत मुख्यमंत्र्यांनी एमआयएमला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. आज ज्याने ज्याने मला … Read more

संतपीठाचे अभ्यासक्रम तातडीने होणार सुरु, शैक्षणिक व्यवस्थापन बामू विद्यापीठाकडे

bAMU

औरंगाबाद – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच नऊ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला होता तेव्हा त्यांनी पैठण येथील संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपविण्याची सूचना केली होती. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निर्णय निर्गमित केला आहे. यामुळे संतपीठाच्या कामाला आता वेग मिळाला आहे. पैठण येथील संतपीठामध्ये भारतीय परंपरा, … Read more

जिल्हा परिषद इमारत भूमीपूजनासाठी वॉटरप्रूफ मंडप

औरंगाबाद – मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून, वीस हजार चौरस फुटांचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येणार आहे. या सभामंडपात एक हजार लोकांच्या बैठकीची व्यवस्था आणि 20 बाय 50 फुटांचे भव्य स्टेज उभारण्यात येत आहे. … Read more

औरंगाबाद जिल्ह्यातील विकास कामे फास्ट ट्रॅकवर पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

cm

औरंगाबाद – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात औरंगाबाद जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या निजामकालीन शाळांचे रूप आता बदलणार आहे. त्याचबरोबर शहरातील सर्व रस्त्यांची अवस्था तातडीने सुधारणार असून सातारा-देवळाई मधील भूमिगत मलनि:सारणाची समस्याही दूर होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा येथील बैठकीत औरंगाबादच्या विविध विकासकामांना फास्ट ट्रॅकवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे संत … Read more

उध्दव ठाकरे टाॅप फाईव्हमध्ये, तुम्ही उकिरडे फिरत बसल्याने भाजपाच्या एकाचाही समावेश नाही : संजय राऊत

sanjay raut

मुंबई | देशात भाजपाची दिवसेंन- दिवस घसरण सुरू आहे. उध्दव ठाकरे यांचा टाॅप फाईव्हमध्ये समावेश असून भाजपाचा एकही मुख्यमंत्री यामध्ये नाही. कारण तुम्ही उकिरडे फिरत बसला हे सगळ्यांना माहित आहे. मग तुमचा का नंबर आला नाही. तुम्ही गर्दी करत केवळ राज्याला अडचणीत आणण्यासाठी काम करत असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. संजय राऊत … Read more

हाॅटेल, रेस्टारंटला अद्याप सूट नाही, मात्र उद्या टास्क फोर्ससोबत बैठक : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई | कोरोनाचे संकट अद्याप हटलेले नाही. महाराष्ट्रातील रेस्टारंट असोशिएशनचे लोक माझ्याकडे आलेले होते. मात्र उद्या सोमवारी 9 आॅगस्ट रोजी टास्क फोर्सकडून आढावा घेतला जाईल, त्यानंतर निर्णय घेतला जाईल. परंतु यासाठी 8 ते 10 दिवस लागतील. त्यामुळे हाॅटेल, रेस्टारंट यांना अद्यापही सूट नसल्याचे संकेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, कोरोनाची … Read more

“बा भास्कर जाधवा…. जनता तुमचो ह्यो माज उतरवल्या शिवाय रव्हची नाय!” – महाराष्ट्र भाजप

चिपळूण | प्रचंड पाऊस झाल्याने आलेल्या महापुरामुळे कोकणातील चिपळूण शहर हे पूर्णपणे अस्थिर झाले. जीवितहानी काही प्रमाणात झाली असून अनेक कुटुंब, संसार अडचणीत सापडले आहेत, मात्र, त्याच सोबत वित्तहानी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. या अनुषंगाने आलेल्या आपत्तीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपळूण मध्ये दाखल झाले होते. त्यांनी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली … Read more

उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा; पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकप्रिय ठरले असून त्यांना पंतप्रधान करा अस मोठं विधान काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. आज पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आलं होत त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाने पुन्हा एकदा भुवया उंचावल्या आहेत. भाजपचे … Read more

संजय राऊतांनी टोला देताच नाना पटोलेंनी दिले ‘हे’ प्रत्युत्तर; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. तत्यामध्ये पटोलेंच्या मनातील मन की बातचा उल्लेख करीत त्यांच्या भाजपनंतरच्या काँग्रेसमधील कामाचा उल्लेख केला आहे. शिवसेनेने लगावलेल्या टोल्याला नाना पटोले यांनीही प्रतिउत्तर दिले आहे. सामनाच्या अग्रलेखातून राऊतांनी केलेल्या लिखाणाबद्दल पटोले यांनी म्हंटल … Read more