केमीकल कंपन्या बंद करण्याच्या मागणीसाठी महिला चढली चक्क पाण्याच्या टाकीवर

शहरात केमिकल कंपन्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दूषित रसायन पाण्यात सोडण्यात येत असल्याने अंघोळीलाही पाणी नाही. या प्रकाराला कंटाळून एका महिलेने शहरातील शिवाजीनगरच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं आहे. दरम्यान शिवाजी नगर पोलिसांनी परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेत सदर प्रदूषणा महिलेला ताब्यात घेतलं.

भिगवन येथून वाळू माफियांकडून २ पिस्टल व ४ काडतुसे जप्त; पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कारवाई

भिगवण जवळील पोंदवाडी फाटा ता.इंदापूर येथुन पुणे ग्रामीण एलसीबी शाखेचे पथकाने तिघे वाळू माफियांकडून दोन पिस्टल व ४ जिवंत काडतुसे जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.संदिप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट यांना बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे तसेच रेकॉर्डवरील फरारी आरोपी यांना पकडण्यासाठी विशेष मोहिम राबविणे बाबत आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, विदयाधर निचित, दत्ता तांबे, अक्षय जावळे यांचे पथक नेमण्यात आलेले होते.

सांगलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी जत तालुक्यातील राजोबाचीवाडी येथील २१ वर्षीय किरण उर्फ केराप्पा ढेमरे या तरुणास जत उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने पोक्सो, बलात्कार, अट्रासिटीचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे. गुडडापूर येथील केराप्पा ढेमरे याची फेसबुकवरून शेगाव येथील अल्पवयीन मुलीची ओळख झाली.

‘रॉ’ चा अधिकारी सांगत अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्याला अटक

देशातील सर्वात मोठी गुप्तचर संस्था असलेल्या रॉ चा अधिकारी असल्याच्या थापा मारून अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या चोरट्याला आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आयपीएस अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र जप्त केले असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी शुक्रवारी दिली. अभिजित पानसरे असे या चोरट्याचे नाव असून तो मूळचा नाशिकचा आहे.

मिरजेत डोक्यात दगड घालून इसमाचा खून;आरोपी पोलीस ठाण्यामध्ये हजर

मिरज येथील महापालिकेच्या मोकळ्या जागेत अनोळखी इसमाच्या डोक्यात राजू जाधव याने दगड घालून खून केला. घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या खुनातील आरोपी राजू जाधव हा स्वत: पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

धामणगाव रेल्वेमध्ये ६ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, अमरावती जिल्ह्यातील सलग दुसरी घटना

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे एका चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. या ६ वर्षीय चिमुकलीला घराबाहेर बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. आरोपी नागेश कुरील असे बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

जीवनातील अपयशाला कंटाळून शासकीय रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या

औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयातील डॉक्टराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शषाद्री गौडा असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरांचे नाव आहे. घाटी रुग्णालयात ते मेडिसिन विभागात साह्ययक प्राध्यापक पदावर कार्यरत होते. गौडा यांनी बेगमपुरा येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे.

प्रेम प्रकरणातून १२ वीला शिकत असलेल्या तरुणीची चाकूने भोसकून हत्या

प्रेम प्रकरणातून १२ वी मध्ये शिकणाऱ्या एका १७ वर्षीय तरूणीला गार्डनमध्ये नेऊन तरुणाने तिच्या पोटात चाकू मारुन तिच्या हत्या केली आहे. यानंतर तरुणाने स्वतःच्या पोटातही चाकू मारल्याची धक्कादायक घटना अमरावतीच्या धामणगाव रेल्वे शहरात घडली आहे. तरुणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला असुन तरुण गंभीर जखमी झाला आहे. तरुणावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

गाणे वाजवण्यावरुन सख्ख्या भावाला भोसकले

नागपूर प्रतिनिधी | मोबाईलवर गाणे वाजवण्यावरुन सख्ख्या भावाने दुसर्‍याला भोसकल्याची धक्कादायक घटना शनिवारी नागपूर येथे घडली. सदर घटनेमुळे प्रतापनगर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सतत मोबाइलवर गाणे वाजविण्यावरून दोन सख्ख्या भावांमध्ये वाद झाला. लहान भाऊ ऐकतच नसल्याने रागाच्या भरात मोठ्या भावाने त्याच्या पोटात चाकू भोसकला. ही घटना प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्यीतील … Read more

सिल्लोडमधील ‘त्या’ खुनाचा ७ महिन्यानंतर लागला तपास; १ लाखाच्या मुद्देमालासह तिघांना अटक

सिल्लोड शहरातील प्रियदर्शनी चौकात वाईन शॉपवर हल्ला करण्यात आला होता. यात मॅनेजर भिकन निळूबा जाधव व त्याचा सहकारी लक्ष्मण पुंजाजी मोरे या दोघांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आला होता. तसेच त्यांच्याकडील 4 लाखांची रोख रक्कम घेऊन अज्ञात आरोपींनी पळ काढला होता. यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.