खडसेंनी निदान तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं, चंद्रकांत पाटलांचा टोला

chandrakant dada khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप मध्ये प्रचंड अस्वस्थता असून नाराजांची संख्या वाढू नये म्हणून आपलं सरकार येणार असं आमदारांना सांगून वेळ मारून नेली जात आहे, असा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केल्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. खडसेंनी निदान तिकडे गेल्यावर तरी खर बोलावं असा टोला चंद्रकांत पाटलांनी … Read more

सत्ता गेल्यामुळे फडणवीस अस्वस्थ, सत्तेसाठी ते तळमळत आहेत; खडसेंचा टोला

Khadse Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप मधून राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस हे सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी ते आजही तळमळत आहेत, अशा शब्दांत खडसेंनी फडणवीसांना टोला लगावला आहे. खरं सांगायचं तर राज्यातील आघाडी सरकार दिवसे न् दिवस मजबूत होत आहे. भाजपधील आमदारांमध्ये … Read more

आता एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

shard pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे केवळ राज्यातील महत्वाचे नेते नसून संपूर्ण देशात राजकीय क्षेत्रात त्यांचे वजन आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. आता माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले … Read more

फडणवीसांनी कुत्र्या-मांजराचा खेळ खेळू नये ; खडसेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना चा उद्रेक होत असून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. दरम्यान राज्यावर मोठं संकट आलं असताना सत्ताधारी आणि विरोधक हे सुद्धा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी कुत्र्या-मांजराचा खेळ खेळू नये … Read more

आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकारचा कोरोना; गिरीश महाजनांचा खडसेंना अप्रत्यक्ष टोला

जळगाव | सध्या राज्यभर कोरोना आजाराचे रुग्ण वाढत आहेत. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया तर दिलीच वर एकनाथ खडसे यांना देखील टीकेचे लक्ष केले. महाजन म्हणाले की, राज्यात कोरोना आहे, पण आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकारचा कोरोना आहे. नुकताच पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस वासी झालेले ज्येष्ठ नेते … Read more

भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी फडणवीसांचीही चौकशी करा – अंजली दमानिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मंत्री एकनाथ खडसे यांचं नाव आलेल्या भूखंड घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. फडणवीसांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदार अंजली दमानिया यांनी वकील अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत न्यायालयात लेखी मागणी केली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या बैठकीतील सगळे पुरावे- मिनिट्स ऑफ मीटिंग रद्द करण्याचे आदेश … Read more

‘मी पुन्हा येईन’ चा उल्लेख करत खडसेंचा फडणवीसांना जोरदार टोला, म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद काही नवा नाही. फडणवीसांवर नाराज होऊन खडसेंनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. त्यानंतर एकमेकांनावर आरोप-प्रत्यारोप चालूच आहेत. आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी मी पुन्हा येईन चा उल्लेख करत फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह ??

Eknath Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. आता ते कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना आता १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. खडसे यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत होता. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी आपली कोरोना चाचणी केली होती. ती पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, एकनाथ … Read more

तुम्ही ईडी दाखवली आता सीडीही निघणार ; राष्ट्रवादीचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. तसेच ‘ईडी’ने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस बजावण्यात आल्याचे … Read more

होय, मला ईडीची नोटीस मिळाली ; एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | होय, मला ईडीची नोटीस मिळाली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली. त्यामुळे खडसेंना ईडीची नोटीस आली आहे या बातमीवर खुद्द एकनाथ खडसे यांनी आता शिक्कामोर्तब केलं. ईडीची नोटीस आल्यानंतर मला महाराष्ट्रातून फोन येत आहेत. मला सहानुभूतीच मिळत आहे. लोकांना हे आवडत नाही”, असं एकनाथ खडसे म्हणाले. ईडीची नोटीस … Read more