सातारा | फलटणचा लाल दिवा कसा काढून घ्यायचा, हा विचार आमच्या इथल्या आमदाराच्या डोक्यात येत होता. तेव्हा जवळचे कनेक्शन कुठून जाते तर ते औंधमधून जाते. कारण बारामती- औंध कनेक्शन लय जोरात आहे. या बहाद्दराने ताईच्या कानात सांगितलं तुम्हांला कारखाना गिप्ट देतो. ताईला कारखाना गिप्ट दिला. जरंडेश्वर कारखाना टेंडर न भरता गेला. मी सत्य बोलत आहे. अमर प्रेम एवढं उठल होत, की त्या प्रेमाला जागृत राहून तो कारखाना नावावर केला. जसा शहाजानं मुमताजच्या नावानं ताजमहाल बांधला तसा आमचा जरंडेश्वर कारखाना 27 हजार शेतकऱ्याचे शेअर्स खावून स्वतः च्या प्रेमाच्या पायात हस्तांतरीत केला, असल्याचा आरोप आ. महेश शिंदे यांनी केला आहे.
बऱ्याच जणांना मी *** घोडा : आ. शशिकांत शिंदेंची जीभ घसरली
सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सातारा जिल्ह्यात किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने शेवटचा टप्पा गाठला आहे. कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही पॅनेलमधून राजकीय आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झाडू लागल्या आहेत. अशातच माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते आ. शशिकांत शिंदे यांचा एक व्हिडिअो जोरदार व्हायरल होवू लागला आहे. त्यामध्ये त्यांची बोलताना जीभ घसरताना दिसून आली. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व … Read more