काय चाललंय काय? आता TMC नेत्याच्या घरी सापडलं EVM, व्हिव्हीपॅट

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्याने देशभरात एकच खळबळ माजली होती. आता पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट सापडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नक्की चाललंय काय? हा प्रश्न आता सर्वसामान्य माणसाला पडतो आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. दरम्यान हावडा येथील उलुबेरिया … Read more

औरंगाबाद जिल्हा बँकेवर शिवसेनेचा भगवा; अध्यक्षपदी नितीन पाटील बिनविरोध, उपाध्यक्षपदी गाढे यांची निवड

औरंगाबाद । संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र भुमरेंनी अर्ज मागे घेतल्यामुळे बाजी पलटली आणि नितीन पाटील यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली, तर उपाध्यक्षपदी अर्जुन गाढे यांची निवड झाली. या विजयानंतर शिवसैनिकांनी … Read more

नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी आज मतदान

Nanded Jilha Bank

नांदेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक पदासाठी आज जिल्ह्यातील १५ केंद्रांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीत ४३ उमेदवार रिंगणात असून २१ संचालकांपैकी ३ संचालक हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये काँग्रेस, शिवसेना व भाजपच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे . विशेष म्हणजे भाजपच्या उमेदवाराने प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदानाच्या दोन दिवस आगोदर पाठिंबा … Read more

आबिटकर म्हणतायत ‘आमचं ठरलं’, गोकुळला विरोधी आघाडीसोबतच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गोकुळ दूध संघ सध्या काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील व भाजपचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे आहे. ही सत्ता उलथून टाकण्याचा निर्धार करत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना, जनसुराज्य पक्ष तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील … Read more

भाजप नेत्यांनी प्रचारात वापरली काँग्रेस नेत्याच्या सुनेची डान्स क्लीप; मोदी शहांवर तोंडघशी पडण्याची वेळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : तामिळनाडूत भाजप नेत्यांकडून प्रचारात अनेक नवीन आयडियाची कल्पना वापरली जात आहे. मात्र, ती वापरताना त्यांची काहीवेळा फसगतही होत आहे. अशीच काहीशी फसगत भाजप नेत्यांची तामिळनाडूत झाली आहे.  प्रचारादरम्यान भाजप नेत्यांनी चक्क काँग्रेस नेत्याच्या सुनेची डान्स क्लीपच वापरली आहे. तामिळनाडूत भाजपच्या नेत्यांनी केलेल्या या प्रतापामुळे भाजपचे नेते, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व … Read more

मी एक तासापेक्षा जास्त वेळ प्रचार करू शकत नाही, ममता दीदींसाठीही नाही; नुसरत जहाँचा व्हिडीओ व्हायरल

Nusrat Jaha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपने बंगाल जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे तर दुसऱ्या बाजूला तृणमूल कॉंग्रेसचे नेते विजय आम्हीच मिळवू असं छातीठोकपणे सांगत आहेत. एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला सध्या सोशल मीडियावर तृणमुलच्या खासदार नुसरत जहाँ यांचा एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. याच गोष्टीचा फायदा घेत भाजप बंगालनं त्यांचा हा … Read more

परभणी जिल्हा बँकेवर आ. वरपुडकर पॅनल चे वर्चस्व

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी व हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणुक निकाल आज घोषीत झाला. दोन्ही जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणूकीत काँग्रेसचे आ. सुरेश वरपुडकर यांच्या पॅनेलने 21 पैकी 12 जागेवर संचालक निवडून आणत निवडणुकीत बाजी मारली आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक निकालाची … Read more

ममता बॅनर्जींच्या पायावर अज्ञातांनी घातली गाडी; तृणमुलकडून भाजपवर आरोप

Mamata Banrjee

कोलकाता । पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचार सुरू झाला असून पहिल्या फेरीच्या निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी नंदीग्राममध्ये निवडणूक प्रचारादरम्यान तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर चार अज्ञातांनी हल्ला केला आहे. याबाबत ममता बॅनर्जी यांनी स्वत: माहिती दिली आहे. ममता बॅनर्जींच्या पायावर अज्ञातांनी गाडी घातल्याचं बोललं जातंय. तृणमुल काँग्रेसने हे काम भाजपचे असल्याचा … Read more

देशातील या पाच राज्यांत निवडणुका जाहीर; जाणुन घ्या तारखा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगाल, आसामसह तमिळनाडू, केरळ या राज्यात आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात येत्या काही दिवसातच निवडणुका होणार असल्याची नुकतीच घोषणा करण्यात आलीय. मुख्य निवडणूक आयुक्तांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा केली आहे. आज निवडणूक आयोगाने या पाचही राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या. त्यामुळे या राज्यांमधील निवडणुकांकडे लक्ष ठेऊन असलेल्यांची प्रतिक्षा संपलीय. … Read more

Breaking News : सांगली महापालिकेत “काँग्रेस – राष्ट्रवादीचा” दिग्विजय ; भाजपचे सात सदस्य फुटले

सांगली | भाजपची एकहाती सत्ता असलेल्या सांगली – मिरज – कुपवाड महानगर पालिकेच्या महापौर पदाची मुदत २१ फेब्रुवारी रोजी संपली होती. आज नवीन महापौर निवडीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे “दिग्विजय सूर्यवंशी” यांची निवड झाली आहे. एका अर्थाने काँग्रेस, राष्ट्रवादीचा दिग्विजय झाला आहे. अतिशय रंगतदार, धक्कादायक आणि उत्कंठा शिगेला पोहचलेल्या … Read more