महावितरणाचा गलथान कारभार, शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत15 एकर ऊस जळून झाला खाक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कडेगाव येथील बारा पट्टा परिसरातील सुमारे 15 एकरातील उसाचे फड शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाले. महावितरणच्या गलथान आणि भोंगळ कारभारामुळे अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसातच कारखान्यास सदर ऊस गाळपासाठी जाणार असताना ही घटना भर दुपारी 1 वाजता घडली. दरम्यान येथील स्थानिक शेतकऱ्यांनी आग विजवण्याचे … Read more

ऊसतोडणी सुरु असतानाच मशीनला लागली आग, मशीनसह तब्बल तीस एकर ऊस जळून खाक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे गेल्या आठवड्यात बागणी येथे ऊसतोडणी मशीन जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच आज आष्टा येथे ऊसतोडणी मशीन जळाले. आष्टा येथे श्री दत्त इंडिया वसंतदादा कारखाना यांच्याकडून परिसरात ऊस तोडणी सुरू होती. ऊस तोडणी मशीनला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याने मशीन संपूर्ण मशीन जळून खाक झाले. यामध्ये सुमारे साठ लाखाचे नुकसान … Read more

…आणि अचानक ऊस तोडणी मशीनने घेतला पेट

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे बागणी तालुका वाळवा येथील काली मस्जिद चौगले मळा येथे ऊस तोडणी मशीनने अचानक पेट घेतला. या आगीत मशीनचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. वारणा भैरेवाडी येथील आप्पा चव्हाण यांची सदर ऊसतोडणी मशीन आहे. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यासाठी या मशिनद्वारे बागणी परिसरातील ऊस तोडणीचे काम सुरू होते. रविवारी … Read more

100 एकरातील ऊस आगीच्या भक्षस्थानी, अचानक लागलेल्या आगीमुळे लाखोंचे नुकसान

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे वाळवा -बावची रस्त्यावरील ओढयालगतच्या शेतातील उसाला अचानक लागलेल्या आगीमुळे सुमारे १०० एकरातील ऊस आगीच्या भक्षस्थानी पडूनलाखोरुपयांच्या ऊस पिकाचे नुकसान झाले. ओढयापासून सुमारे ५०० मीटर अंतरावरील मुख्यरस्त्यालगतच्या शेतातील विजेच्या तारांमुळे शॉर्टसर्कीट होऊन खालील ऊसाने पेट घेतला असल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या भागात सर्वत्र ऊसशेती असल्याने गळीतास जाणाऱ्या ऊसाचे मोठे … Read more

लोकं अशीच जळून मरतील..आपण तमाशा पाहायचा का…?; मुळशी आग दुर्घटनेवर प्रविण तरडेंचा भडका

Pravin Tarde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या सोमवारी पुण्यातील मुळशी तालुक्यात असणाऱ्या एका सॅनिटायझर कंपनीला आग लागल्याची दुर्देवी घटना घडली. या दुर्घटनेत तब्बल १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत मराठी अभिनेता व लेखक प्रवीण तरडे यांनी अतिशय संताप व्यक्त केला आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. तेथील परिस्थिती पाहून प्रविण तरडेंचा राग … Read more

लासलगाव येथील कांद्याच्या गोदामला भीषण आग

नाशिक | नाशिक येथील लासलगाव निर्यातदार कांदा व्यापारी कांतीलाल सुराणा यांचे लासलगाव – विंचूर रोड वर कांद्याचे मोठे गोदाम आहे. या गोदामात असलेल्या लाखो रुपयांचा कांदा हा जळून खाक झाला आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. लासलगाव ही कांद्याची मोठी बाजारपेठ समजली जाते. इथून कांदा निर्यात देखील केला जातो. सुरणा हे इथले हे … Read more

थंडीपासून संरक्षणासाठी चुलीसमोर बसलेल्या महिलेचा जळून दुर्दैवी मृत्यू

परभणी जिल्ह्यातील गारठून टाकणाऱ्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी घरातील चुलीसमोर बसलेल्या महिलेच्या साडीने अचानक पेट घेतल्याची दुर्दैवी घटना नववर्षाच्या सायंकाळी पाथरी तालुक्यात घडली. याघटनेत महिलेचा परभणीत उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.