फेसबुकवर शिकारीची पोस्ट टाकली अन् वनविभागने पट्ट्याला घामच फोडला

सातारा | सोशल मीडियावर आपल्या मित्रमंडळीत क्रेज दाखविण्याच्या उद्देशानं फेसबुकवर शिकारीची पोस्ट टाकणे चांगलेच महागात पडले आहे. दारूच्या नशेत मित्राच्या नजरेत प्रतिष्ठा वाढविण्याच्या नादात पोस्ट टाकणाऱ्यास वनविभागाने थेट चाैकशी करत घामच फोडला. याबाबत सविस्तर वृत्त असं की, मौजे चिकणवाडी (करंडी, ता. मेढा) या वस्तीतील नितीन आनंदा चिकणे यानं स्वत:च्या फेसबुक अकाऊंटला शिकारीच्या उद्देशानं पोस्ट टाकली. … Read more

अवैध लाकूड वाहतूक : महामार्गावर तीन ट्रकसह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

कराड | पुणे- बंगळूर महामार्गावर उंब्रज गावच्या हद्दीत अवैध लाकूड वाहतूक प्रकरणी तीन वाहनांवर वनविभागाने कारवाई केली. या कारवाईत 14 लाखाचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, रात्रीची गस्त घालत असताना उंब्रज- कराड व उंब्रज – पाटण या दरम्यान तीन कारवाई करण्यात आल्या. वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनरक्षक बी.जी. खटावकर, वनरक्षक यु. एम. पांढरे यांनी … Read more

सडानिनाई वनहद्दीत बेकायदा बांधकाम व खाणकाम : तीन वाहने जप्त

कराड | तालुक्यातील सडानिनाई येथे वनहद्दीत बेकायदा बांधकाम व खाणकाम केल्याप्रकरणी वनविभागाने तेथील भरत घोंडीबा झोरे याच्यावर गुन्हा दाखल करत खाणकाम बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही जांभा दगड चिरे खाणीचे काम सुरू ठेवल्याने २ मिनी ट्रक व ट्रॉलीसह १ ट्रॅक्टर ही तीनही वाहने जप्त करून भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची … Read more

वनविभागाची कारवाई : चोरीच्या कोळसासह 6 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा वनविभागाच्या भरारी पथकाने काल रात्री दि. 11 रोजी कांबळेश्वर – खूंटे रोडवर मोजे कांबळेश्वर (ता.फलटण) गावचे हद्दीत अवैद्यरीत्या वाहतुक करीत असताना आढळून आल्याने ताब्यात घेवून जप्त केला आहे. वनविभागाने आयशर ट्रक सह 150 पोती कोळसा (वजन सुमारे 3500 किलो) इत्यादी सुमारे 6.50 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. वनविभागाने … Read more

वनविभागाची कारवाई : राष्ट्रीय महामार्गावर खैर लाकडासह ट्रक जप्त

कराड | खैर या बहुमुल्य प्रजातीची विनापरवाना वृक्षतोड करुन त्यापासून माल तयार करुन वाहतुक करीत असताना वनविभागाने खैर लाकूड माल व ट्रक जप्त केला. या कारवाईत 4 लाख 67 हजार 52 रुपये किंमतीचा मुद्देमाल वनविभागाने जप्त केला आहे. वनविभागाने दिलेली माहिती अशी, गुरूवारी दि. 10 मार्च रोजी सहाययक वनसंरक्षक (वनीकरक व कॅम्पा) सातारा हे मौजे … Read more

महाबळेश्वर रस्त्यावर रानगव्यांचा मुक्त संचार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे सध्या रानगव्यांचा वावर वाढला आहे. सातारा-पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावर वेण्णा लेक जवळ आज सकाळी रानगव्यांचा मुक्त संचार पहायला मिळाला. महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जगाला क्षेत्र आहे. या याठिकाणी जगलं असल्याने मोठ्या संख्येने विविध प्राणी वास्तव्यास असतात. दरम्यान जंगल भागाने वेढलेल्या या भागात अनेक … Read more

जागतिक वन्य दिनानिमित्त नाईट जंगल सफारीचे आयोजन : महादेव मोहिते

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्हा पर्यटनाच्यादृष्टीने समृद्ध करण्यासाठी व पर्यावरणाची बांधिलकी निर्माण व्हावी या हेतूने सातारा वन विभागाच्या वतीने दि. 21 मार्च रोजी जागतिक वन्य दिनानिमित्त नाईट जंगल सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या हद्दीत सातशे पाणवठे विकसित करणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. वनविभागाचा अत्यंत … Read more

कराडनजीक हॉटेलवर वन विभागाचा छापा; बंदिस्त ठेवलेल्या घारीची केली सुटका

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील बेलवडे हवेली हद्दीत असलेल्या हॉटेल राऊमध्ये एक वन्य पक्षी घार ही पिंजऱ्यात बंदिस्त ठेवण्यात आली होती. याबाबतची माहिती मिळताच कराड येथील वन अधिकाऱ्यांनी छापा टाकला. तसेच एका पिंजऱ्यात बंदिस्त ठेवण्यात आलेल्या घारीला ताब्यात घेतले. याप्रकरणी हॉटेल मालक विवेक रामचंद्र देशमुख यांना वनविभागाने नोटीस बजावली आहे. याबाबात अधिक माहिती … Read more

निगडीत विहिरीत पडलेल्या जखमी सांबराला जीवदान

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा तालुक्यातील निगडी येथील एका विहिरीमध्ये पडलेल्या सांबराला तब्बल 8 तासाच्या अथक प्रयत्नानंतर जीवदान देण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले. दरम्यान पायामध्ये शिकारीचा फासा लागून जखमी झाल्याने सांबर विहिरीत पडले होते. त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आल्याचे माहिती सातारा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी दिली. याबाबत अधिक … Read more

मादी बिबट्या आणि बछड्याची अनोखी भेट वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात झाली चित्रित

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे मादी बिबट्या आणि तिच्या बछड्याची अनोखी भेट झाली. वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात हा प्रसंग चित्रित झाला आहे. वाटेगाव येथील एका शेतात, बिबट्याचा बछडा भटकंती करत आला होता. वन विभागाने या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले होते. वन विभागाने ह्या परिसरातील ग्रामस्थाना मार्गदर्शन केले. या परिसरात शांतता ठेवण्यात … Read more