चचेगाव परिसरात बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील चचेगाव येथील एका वस्तीवर बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. चचेगाव येथील लोकवस्तीत काल बिबट्याने रात्रीच्यावेळी येऊन एका कुत्र्यावर हल्ला केला आहे. त्याच्या हल्ल्याची द्रुश्य सीसीटीव्ह कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. बिबट्याकडून रात्रीच्यावेळी केल्या जात असलेल्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चचेगाव आणि परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे मागील काही … Read more

ओगलेवाडीत जिवंत कासव, मांडूळ विक्रीसाठी घेवून फिरणारे चाैघे वनविभागाच्या ताब्यात

कराड | कराड तालुक्यात काही लोक जिवंत वन्यजीव मांडूळ व कासव हे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची खात्रीपूर्वक गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे संशयास्पद चाैघांची झडती घेतली असता त्यांच्या जवळ एका पिशवीत जिवंत कासव व एका पिशवीत एक जिवंत मांडूळ मिळून आले आहे. त्यामुळे वनविभागाच्या फिरत्या पथकाने चारजणांना ताब्यात घेतले असून त्याच्याकडून दोन दुचाकी, … Read more

तांबवेत बिबट्याचा भरवस्तीत हल्ला : नऊ वर्षाचा मुलगा जखमी, लोकांच्यात भितीचे वातावरण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तांबवे परिसरात बिबट्याने गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी दि. 9 रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास लोकांच्या वस्तीत येऊन एका नऊ वर्षाच्या लहान मुलावर पाठीमागून हल्ला करून जखमी केले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून लोकांच्यात भितीचे वातावरण आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तांबवे गावच्या हद्दीत … Read more

वनविभागाची कारवाई : सातारा वनविभागाच्या हद्दीत अवैधरित्या झाडांची तोड करणारे दोघे ताब्यात

सातारा | अवैधरित्या झाडांची तोड करून ट्रॅक्टर व टेम्पोच्या सहाय्याने विनापरवाना वाहतूक करणार्‍या दोन संशयीतांना सातारा वनविभागाने ताब्यात घेतले असून लाकूडमाल जप्त केला आहे. जयवंत रामचंद्र वाघमळे व शंकर रामचंद्र वाघमळे (दोघेही रा. कण्हेर) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत वनविभागाने दिलेली माहिती अशी, दिनांक 31 ऑगस्ट रोजी शहर वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण यांना मौजे कोडोली -देगाव … Read more

सातारा शहरातील “या” भागात शिरला बिबट्या, वन विभागाची शोध मोहिम सुरू

सातारा | सातारा जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या परिसरात बिबट्या असल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर सोमवारी दि. 30 रोजी रात्री वन विभागाच्‍या पथकाने शोध मोहिम राबविली आहे. रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासह शेजारील संपूर्ण परिसर पिंजून काढत त्‍याचा शोध घेण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र अंधार, पावसामुळे वन विभागाने राबविलेल्‍या शोध मोहिमेत अडचणी येत होत्‍या. रात्री दहापर्यंत विविध ठिकाणी शोध घेतल्‍यानंतरही बिबट्याचा मागमूस लागू … Read more

बेलवडे बुद्रुकमध्ये बिबट्याचा मृत्यू

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक येथे बिबट्याचा मृत्यूू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. मृत्यू झालेल्या बिबट्याच्या बछड्याचे वय सुमारे तीन वर्षाचे वय असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. याबाबतची माहिती ग्रामस्थ्यांकडून वनविभागाला देण्यात आली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक येथील शिवारात बुधवारी सकाळी 10 … Read more

वाघासह बिबट्याच्या नख्यांची तस्करी करणार्‍या आरोपींच्या घर, दुकानावर छापा, आणखी 9 नखे सापडली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वाघासह बिबट्याच्या नख्यांची तस्करी करणार्‍या आरोपींच्या घर आणि दुकानावर वन विभागाच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी एका आरोपीच्या ज्वेलर्स दुकानात आणखी 9 नख्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वन विभागाने आजअखेर आरोपींकडून 20 नख्या हस्तगत केल्या असून या सर्व नख्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्या जाणार आहेत. या तस्करीत आंतरराज्य टोळीचा सहभाग असण्याची … Read more

पर्यटकांसाठी खुशखबर : जागतिक वारसा स्थळ असणारे कास पुष्प पठार 25 ऑगस्टपासून खुले होणार

Kas Pathar Satara

सातारा | जागतिक वारसा स्थळ असणारे कास पुष्प पठार पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. कास पठार कार्यकारी समिती व वनविभाग जावली – सातारा यांच्या संयुक्त बैठकीत बुधार दि. 25 ऑगस्टपासून हा निर्णय घेण्यात आला. कास पठारावर विविध रानफुलांचा रंगोत्सव सुरू झाला असल्याने पठार विविध फुलांनी बहरणार आहे. त्यामुळे हा फुलोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांना सुवर्णसंधी मिळणार आहे. … Read more

सांगली जिल्ह्यात उडाली मोठी खळबळ : कापरीत जिवंत 19 नाग सापडले

शिराळा प्रतिनिधी | आनंदा सुतार शिराळा तालुक्यातील कापरी येथील एका फार्म हाऊसमध्ये मडकी, पोते व पिशवीमध्ये ठेवलेले 19 जिवंत नाग सापडले. वनविभागाने कारवाई करत जप्त केलेले जिवंत नाग नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. याबाबत अज्ञातां विरोधात वन विभागाकडून गुन्हा दाखल झाला आहे. निनावी दूरध्वनी वरून वन विभागाच्या 1926 हेल्पलाईन वर जिवंत नाग बंदिस्त करुन ठेवले असून, … Read more

वाघ, बिबट्या नखे विकणार्‍यांना सापळा रचून अटक; 11 नखे जप्त

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरातील कृष्णा नाका परिसरात वाघ व बिबट्या नखे विकणार्‍या टोळीतील दोघांना वनविभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून 11 वाघ व बिबट्याची नखे जप्त करण्यात आली आहेत. दिनेश बाबूलालजी रावल वय 38, रा. सोमवार पेठ, कराड, अनुप अरूण रेवणकर (वय 36, रा. रविवार पेठ, कराड) अशी अटक करण्यात आलेल्यांची … Read more