कोल्हापूरात ऊस दरावरून संघर्षाची ठिणगी !

कोल्हापुरात ऊस दराबाबत कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्यात सुरू असणारी बैठक फिस्कटली आहे. ‘एफआरपी’ चे तुकडे करण्याचा कारणावरून साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेत मतभेद झाल्याने या बैठकीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला आहे. तर २३ नोव्हेंबरला होणाऱ्या ‘स्वाभिमानी’च्या उस परिषदेत अंतिम निर्णय होईपर्यंत जिल्ह्यातील कोणताच साखर कारखाना सुरू करू देणार नसल्याचा गंभीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. 

‘४ हजार दर दिल्याशिवाय उसाला कोयता लावू देणार नाही’ – रघुनाथदादा पाटील

सोलापूर प्रतिनिधी | राज्यातील साखर कारखान्यांनी चालू हंगामात शेतकऱ्यांच्या उसाला ४ हजार रुपये दर जाहीर केल्याशिवाय उसाला कोयता लावू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शेतकरी परिषदेमध्ये राज्य सरकारला दिला. आज पंढरपूर इथे संत तनपुरे महाराज मठामध्ये शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यातून हजारो शेतकरी संघटनेचे नेते, पदाधिकारी … Read more

थकीत बिलासाठी स्वाभिमानीचा केन आग्रोवर मोर्चा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने थकीत ऊस बिले तातडीने द्यावीत या मागणीसाठी आज केन ऍग्रो साखर कारखान्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी २८ जून पर्यंत बिले देतो असे लेखी पत्र कारखाना प्रशासनाच्यावतीने देण्यात आले. २८ जून पर्यंत बिले न दिल्यास २९ जून पासून कारखान्याचे अध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन … Read more