वा रे पठ्ठ्या ! थेट रेल्वे स्थानकातच उभी केली कार

car

औरंगाबाद | रेल्वेच्या नियमाप्रमाणे कोणतेही दुचाकी किंवा चारचाकी वाहन विनापरवाना रेल्वेस्थानकात आणण्यास किंवा पार्किंग करण्यास सक्त मनाई आहे. मात्र याच नियमांची सऱ्हास पायमल्ली करून थेट रेल्वेच्या तिकीट खिडकीसमोर कार पार्किंग केल्याचा अत्यंत खेदजनक प्रकार लासुर स्टेशन येथे घडला. रेल्वे प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा मानसिक, आर्थिक मनस्ताप होऊ नये किंवा रेल्वे स्टेशनवरील अधिकारी-कर्मचारी यांना काम करताना कोणतीही … Read more

आता शहरात आजारी मुलांची सरसकट होणार कोरोना चाचणी

corona

  औरंगाबाद | आजघडीला कोरोनाची दुसरी लाट आता ओसरु लागली असली तरी, लवकरच तीसरी लाट धडकणार असल्याचा दावा तज्ञांकडून केला जात आहे. शिवाय या लाटेत मोठ्या प्रमाणावर लहान मुले संक्रमित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्वच खासगी रुग्णालयात ताप असलेल्या मुलांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. मनपाच्या वतीने हॉस्पिटल्सना तशा … Read more

दर्ग्याला दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून दागिने केले लंपास

theft

औरंगाबाद : खुलताबाद येथील दर्गा येथे दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरट्यानी डल्ला मारला आहे. चोरट्यानी घरातून एकूण १ लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. हिलाल कॉलनी येथील गुलाम अहेमद खान हे त्यांच्या कुटुंबियांसह शनिवारी दुपारी ३ ते रात्री ८ वाजेदरम्यान खुलताबाद येथे गेले होते. घरात कुणीही नसल्याची संधी साधून … Read more

विविध मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे ‘जबाब दो’ आंदोलन

strike

औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आज आज मध्यवर्ती विभागीय कार्यालयासमोर ‘जवाब दो आंदोलन’ करण्यात आले. २०१९ मध्ये भरती झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांची लवकरात लवकर नियुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. २०१९ मध्ये भरती झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी बऱ्याच दिवसापासून वारंवार निवेदनाद्वारे प्रशासनाला आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता, मात्र प्रशासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी कोणतेही … Read more

जिल्हयात डेंग्यू, चिकनगुनीयाने काढले डोके वर

dengue-malaria

औरंगाबाद : जिल्हयात पावसाळ्याला सुरुवात झाली असून ग्रामीण भागात डेंग्यू आणि चिकनगुनीया या आजाराने डोकेवर काढले आहे. जिल्ह्यात एकूण १३ डेंग्यूचे तर चिकनगुनीयचे १६ रुग्ण आढळले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात जावून विशेष जनजागृती करण्याचे काम सुरू असल्याचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितले. नागरिकांच्या रक्ताचे नमुने आरोग्य विभागाच्या वतीने … Read more

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; हेडगेवार हॉस्पिटल येथील घटना

dead

औरंगाबाद : डॉक्टर्सच्या आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे माझ्या पतीचा मृत्यू झाला, यांच्यामुळे माझ्या पतीचा जीव गेला यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी रुग्णाच्या पत्नी दिव्या प्रकाश रोकले यांनी केली आहे. प्रकाश रोकले असे दिव्या यांच्या पतीचे नाव आहे ते शिवनेरी कॉलोनीत राहत होते त्यांना बसण्याच्या ठिकाणी पुरळ झालेली होती, त्यांचा त्रास वाढल्याने त्यांना २८ जून रोजी … Read more

घरातून 3 मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक

औरंगाबाद : घराच्या उघड्या दरवाजातून तीन मोबाईल चोरणाऱ्या दोघांना मुकुंदवाडी पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वानखेडे यांनी दोघांना मंगळवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश रविवारी दिले. कार्तिक श्रीनिवास वय 23, आणि गुना बापू गोपाल वय 22, (रा. पणेर कुटाई जि. वेल्लोर तामिळनाडू) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात केलास (रमेश … Read more

मनपाच्या वाहनांच्या बॅटऱ्या चोरण्यास पोलिस कोठडी

औरंगाबाद : सेंट्रल नका येथे उभ्या असलेल्या मनपाच्या वाहनाच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या तरुणाला जिन्सी पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. शेख अमीर शेख इब्राहिम वय 21, रा. बायजीपुरा असे आरोपीचे नाव आहे. त्याला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदानदाधिकारी ए. एस. वानखेडे यांनी रविवारी दिले. मानपाचे कर्मचारी शेख आहेमद शेख रज्जाक रा. हर्षनगर हे 24 … Read more

घरात घुसून ४५ हजारांचे मंगळसूत्र लांबवले

औरंगाबाद : शहरात अनेक चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच शहरात मंगळसूत्र चोरीच्या घटना ही जास्त प्रमाणात वाढल्या आहेत. मुकुंदवाडी भागात राहणारी महिला व तिचा मुलगा तिच्या मामाचे निधन झाल्यामुळे अंतविधीसाठी कडा-आष्टी बीड येथे गेल्या होत्या. ही संधी साधून चोरट्याने १३ जून रोजी १० ते १२ वाजेच्या दरम्यान घरातून ४५ हजार रुपयांचे १५ ग्रॅमचे मणी मंगळसूत्र … Read more

शहरातून पुन्हा चार दुचाकी चोरीला

bike thift

औरंगाबाद : शहरात अनेक भागातून दुचाकी चोरीची घटना समोर येत आहे. शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत जात असल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. चोरी झालेल्या चार दुचाकींची नोंद करण्यात आली आहे. बळीराम तांबे (३६,रा.सिंगापूर कॉम्प्लेक्स, गोमटेश मार्केट रोड) यांची दुचाकी (एमएच २० बीझेड ५७०९) ही दुचाकी गोमटेश मार्केटच्या पार्किंगमधून चोरून नेण्यात आली. त्यानंतर योगेश सोमनाथ राऊतराव … Read more