नगराध्यक्षा व भाजपचे नगसेवक टक्केवारीच्या मानसिकतेत ; नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांचा हल्लाबोल

 कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड, (प्रतिनिधी)- अर्थसंकल्पातील अनेक गोष्टीत बदल होतो आहे. त्या गोष्टीही नगराध्यक्षांसह त्यांच्या सहकाऱ्यांना खटकल्याने त्यांनी गोंधळ घातला आहे असा आरोप करत नगराध्यक्षा व त्यांचे नगसेवक टक्केवारीच्या मानसिकतेत असल्याने कराडच्या विकासाचा खोळंबा झाला आहे असा हल्लाबोल जनशक्ती आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी केला पत्रकार परिषदेत केला. श्री. यादव म्हणाले, अर्थसंकल्पीय सभेत … Read more

कराड तालुक्यात ‘या’ गावात संचारबंदी; सापडले तब्बल १६ कोरोनाबाधित

 कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील घारेवाडी गावात तीन दिवसांत 16 रुग्ण आढळल्याने संपूर्ण गाव प्रशासनाने सोमवारी लॉक केले. तालुक्यात कोरोना बाधित कमी प्रमाणात असताना अचानक एकाच गावात एकाच दिवशी 12 रूग्ण सापडल्याने खळबळ उडाली. प्रशासनाने अन्य शंभर जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून सध्या सात दिवसांसाठी गाव लॉक असल्याची माहिती तहसिलदार अमरदीप वाकडे यांनी … Read more

पोलिस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टरांच्या कॅबिनमध्येच एकावर चाकू हल्ला; कराड शहरातील घटनेने खळबळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या दालनात एकावर चाकूने वार केल्याची घटना सोमवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. बी. आर. पाटील यांनी तात्काळ मारेकर्‍यास ताब्यात घेतले. व जखमीस उपचारासाठी रूग्णालयात हलवण्यात आले. किशोर पांडुरंग शिखरे (वय 30, रा. हजारमाची, ता. कराड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. तर लखन भागवत माने … Read more

कराड नगरपालिका : 134 कोटी 79 लाखांचा अर्थसंकल्प उपसूचना घेवून बहुमताने मंजूर; जनशक्ती अन् भाजपमध्ये गदारोळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगपरिषदेचे 2021- 2022 सालातील 134 कोटी 79 लाख 20 हजार रूपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. सत्ताधारी जनशक्ती विकास आघाडीने सूचविलेल्या उपसूचना स्विकारून अर्थसंकल्प बहुमताने मंजूर करण्यात आला. अर्थसंकल्पातील सूचना मांडल्यानंतर सभागृहात जनशक्ती, भाजप यांच्यात गदारोळ मांडला होता. नगराध्याक्षा रोहीणी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कोरोना पार्श्वभूमीवर आजची … Read more

सातारा जिल्ह्यात दिवसभरात सापडले 130 नवीन कोरोनाग्रस्त; विद्यार्थीही कोरोनाग्रस्त आढळत असल्याने पालकांच्यात चिंता

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्याय कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 130 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा अता 58 हजार 499 वर पोहोचला आहे. सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदे अंतर्गत असलेल्या 16 शाळांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती पुढे आली आहे. या 16 शाळांना आता टाळे ठोकण्याचे आदेश … Read more

विद्यापीठात फॉर्म भरायला गेलेल्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघे ठार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोडशी गावच्या हद्दीत दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाची जोरात धडक बसली. यामध्ये तिघेजण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. सोमनाथ जनार्दन पवार (वय 24), विक्रम माणिक निकम (वय 26), व अन्य एक जण (नाव समजू शकले नाही) (सर्व रा. कुमठे, ता. कोरेगाव) असे अपघातात … Read more

कराडच्या तहसील कार्यालयातील कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात; फेरफार उतारा नकल देण्यासाठी मागितली लाच

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी फेरफार उतारा नकल देणे करता तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षापाल याने आठशे रूपये लाचेची मागणी करून तीनशे रूपयाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अभिलेख कक्षापाल याला रंगेहात पकडले. महेश्‍वर नारायण बडेकर (अभिलेख कक्षापाल (रेकॉर्ड किपर), तहसील कार्यालय कराड, वर्ग 3, रा. शिवशक्ती निवास, शास्त्रीनगर, रिमांड होमच्या पाठीमागे, मलकापूर) असे कारवाई करण्यात … Read more

लग्नात नवरी-नवरदेवासोबत फोटो काढणं महिलेला पडले महागात; 14 तोळे सोने असलेली पर्स चोरट्याने पळवली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी येथील पंकज हॉटेलमध्ये सुरू असलेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमातून एका महिलेचे सुमारे पाच लाख रूपये किमतीचे 14 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद सविता सुधीर पाटील (वय 41, रा. वारूंजी, विमानतळ ता. कराड) यांनी रात्री उशिरा शहर पोलिसात दिली आहे. याबाबत … Read more

सातारा जिल्ह्यात संचार बंदी लागू; कोणत्या गोष्टींवर निर्बंध अन कोणत्या गोष्टींना सूट जाणून घ्या

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सातारा जिल्ह्यातील काही प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. खबरदारीच्या उपायोजना म्हणून सातारा जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचार बंदी लागू केलेली आहे, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी … Read more

फास्टॅग नसणाऱ्या वाहनांमुळे महामार्गांवर लांबच लांब रांगा; तासवडे टोल नाक्यावर वाहनांना फास्टॅग बसविण्यासाठी गर्दी

कराड प्रतिनिधी । टोलनाक्यांवरुन जाणाऱ्या सर्व गाड्यांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. दरम्यान फास्टॅग बसविण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देऊनही फास्टॅग न बसविणाऱ्या वाहनधारकांकडून टोलनाक्यावर दुप्पट टोल वसुली करण्याबाबतच्या शासन निर्णयाची मंगळवारी तासवडे (ता. कराड) येथील टोल संचालक, यंत्रणेने कडक अंमलबजावणी सुरु केली. त्यानुसार फास्टॅग नसणाऱ्या अनेक वाहनधारकांना दुप्पट टोल भरावा लागला. परिणामी, त्यामुळे वाहनधारकांनी तासवडे टोलनाक्यावर … Read more