बेळगाव भीषण अपघात: ट्रॅक्टर पलटी होऊन नदीत कोसळला; 7 महिला ठार, 15 जखमी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर खानापूर तालुक्यातील इटगी जावळी बोगुर पुलावरून ट्रॅक्टर पलटी होऊन नदीत कोसळल्याने सात महिला ठार झाल्याची दुर्देवी घटना घटना घडली आहे. आज सकाळी सकाळी 15 पेक्षा अधिक जणांची ऊस तोडणारी लोकांची टोळी बोगुर गावातून इटगीकडे जात होती. त्यावेळी चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टरच्या नदीत कोसळली. जखमींपैकी अनेकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात … Read more

कोल्हापूरमधील केर्ली,सातार्डे येथील दोन खासगी सावकारांविरोधात गुन्हे दाखल

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर सहकार विभागाने गेल्या आठवड्यात नऊ खासगी सावकारांची घरे, दुकाने आणि त्यांच्या कार्यालयावर छापे टाकले होते. त्यापैकी दोघा खासगी सावकारांवर पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. केर्ली (ता. करवीर) येथील शहाजी विलास पाटील आणि सातार्डे (ता. पन्हाळा) येथील विनायक सुभाष लाड यांचा यामध्ये समावेश आहे. २८ जानेवारी रोजी सहकार विभागाच्यावतीने … Read more

कोल्हापुरात दोन गटांत झालेल्या हाणामारीत झालेल्या खूनप्रकरणी एकाला जन्मठेप

कोल्हापूर- आरळे (ता. करवीर) येथील शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पांडूरंग रामचंद्र देसाई (वय ५५) यांचा राजकीय वैमनस्यातून झालेल्या वादातून गोळीबार करून खून केल्याप्रकरणी आरोपी सुरेश भाऊसाहेब पाटील (वय ४३, रा. आरळे, ता. करवीर ) याला दोषी ठरवत कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एस. विठलानी यांच्या कोर्टासमोर सुनावणी झाली.

कोल्हापूरात पैशाच्या हव्यासापोटी मद्यपीचा खून

पैशाची गरज असल्याने टेंबलाई नाका येथील सैन्यदलाच्या जागेत झुडपात झोपलेल्या मद्यपी बंडी नागार्जुन (वय ३०, रा.वेलदूर, जिल्हा मेहबूबनगर, आंध्रप्रदेश) याच्या डोक्यात काठीचे फटके मारुन खून केल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी संशयित अमीर दिलावर तहसिलदार (वय २६, रा. टेंबलाई नाका, रेल्वे फाटक) याला रात्री राजारामपुरी पोलिसांनी अटक केली.

बँकांवर दरोडे टाकणाऱ्या आंतरराजीय टोळीला जेरबंद करण्यात कोल्हापूर पोलिसांना यश

दक्षिण भारतात बँकांना टार्गेट करणाऱ्या टोळीला कोल्हापूर पोलिसांना जेरबंद करण्यात यश आलं आहे. या टोळीतील चार आरोपीना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गावठी बनावटीचे दोन कट्टे,15 जिवंत काडतुसे, 93 हजार रुपयांची 10 आणि 5 रुपयांची नाणी,स्कार्पिओ असा 7 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुटख्याच्या बॅगा चोरल्याच्या संशयातून एकाचा खून, दोघे गंभीर; सहा जणांना अटक

गुटख्याच्या बॅगा चोरल्याच्या संशयातून अमानुष मारहाण केल्याने मृत्यू झालेल्या तरुणाच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा जणांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील सहभागी अन्य चौघा जणांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात अली आहेत. या घटनेत दानोळी (ता. शिरोळ) येथील अर्जुन नामक तरुणाचा मृत्यू झाला असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे.

लग्नाचा बनाव करून व्यापाऱ्यास ६ लाखाचा गंडा, ७ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा

एका उच्चशिक्षित तरुणीबरोबर लग्न लावण्याचा बनाव करत, बनावट पालक व खोटी कागदपत्रे तयार करून ७ जणांच्या टोळीने येथील एका कापड व्यापाऱ्याची सोने, चांदी आणि रोख रकमेसह ६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कापड व्यापारी भैरूलाल शांतिलाल भंडारी (वय ३५, आझाद चौक) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कोल्हापूर स्फोटाचा सखोल तपास सुरु; २०१४ ची पुनरावृत्ती झाल्यामुळे खळबळ

पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूरचा एंट्री पॉइंट समजल्या जाणाऱ्या उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली झालेल्या स्फोटात एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट कमी तीव्रतेचा असून सुद्धा घटनास्थळी बॉम्ब शोधक आणि फॉरेन्सिक लॅबचे पथक तपासणी करत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली होती. 

इचलकरंजी मध्ये बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत असणाऱ्या दातार मळा इथं एका कारखान्यात बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसंच त्यांच्या जवळ असणाऱ्या १० लाख १ हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

कोल्हापुरात गांजा विक्रीला निवडणुकीच्या काळात अच्छे दिन, महिलेसह एकास अटक

राजर्षी शाहू नाक्याजवळ गस्त घालत असताना गांजा विक्री करणाऱ्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली असून त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. सुनीता किरण अवघडे आणि अमर सदाशिव पाटील अशी संशयितांची नावे आहेत. सायंकाळी सव्वासात वाजता ही कारवाई करण्यात आली.