साताऱ्यासह कोल्हापुरातील तब्बल ‘इतक्या’ उद्योजकांना नोटिसा; MIDC ने दिला थेट ‘हा’ इशारा

MIDC News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील अनेक उद्योजकांनी औद्योगिक वसाहतींमधील भूखंड आपल्या ताब्यात ठेवले आहेत. त्यांना हे भूखंड विकसित करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विशेष मुदतवाढ योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन केले असून त्याची मुदत ही ३० जूनपर्यंत आहे मात्र, तत्पूर्वी एक नोटीस कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण ५३६ उद्योजकांना एमआयडीसीने पाठविली आहे. या नोटिसीमुळे उद्योजकांमध्ये चिंतेचे … Read more

साताऱ्यातील MIDC मध्ये मोठ्या प्रमाणात गुंडगिरी सुरु : नरेंद्र पाटील

Narendra Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्यातील एमआयडीसीत अनेक वर्षांपासून गुंडगिरी सुरू आहे. या गुंडगिरीमुळे खऱ्या कामगारांना काम मिळत नाही. माथाडी कामगार, स्थानिक यांच्याऐवजी परप्रांतियांना प्राधान्य दिले जाते. ठेकेदार माथाडी कायद्याची अंमलबजावणी करत नाहीत. नावापुरता कामगार नियुक्त करतात व मलिदा खातात. अशा एजंटगिरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार आहोत, असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष … Read more

कोल्हापुरात अग्नितांडव…; गोकुळ शिरगाव MIDC मधील सेराफ्लेक्स युनिटमध्ये आग

fire kolhapur midc

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापुर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव एमआयडीसी (MIDC) मधील सेराफ्लेक्स युनिटमध्ये असलेल्या शेरा प्लस केमिकल कंपनीला तीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली आहे. आगीमुळे धुरांचे लोट परिसरात पसरू लागले आहेत. दरम्यान अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक … Read more

राज घराण्याचं रक्त असले तर MIDC कोरेगावला नेवून दाखवा : आ. जयकुमार गोरे

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके म्हसवडला होणारी एमआयडीसी कोरेगावला स्थलांतरीत झाली आहे आणि माणचे आ. जयकुमार गोरे यांच्या निष्क्रियतेमुळेच हे घडल्याचा आरोप होत असताना रामराजेंनी कोरेगावला एमआयडिसी का व्हावी, हे समजवुन सांगण्यासाठी एक बैठक कोरेगाव मध्ये बोलावली होती. या बैठकीत रामराजेंना कडाडुन विरोध झाला. या विरोधाचं खापर रामराजेंनी आ. जयकुमार गोरे यांच्यावर फोडलं होतं. या नंतर … Read more

पैठण एमआयडीसीतील मेट्रिक्स कंपनीत भीषण आग

औरंगाबाद – येथून जवळच असलेल्या पैठण एमआयडीसीतील मेट्रिक्स कंपनीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत मिथेल कंटेंनर ने आग पकडल्याने स्फोटासारखे आवाज येत असल्याचे तसेच नवीन प्लांट चे काम सुरूअसल्याने तसेच मिथेल कंटेंनरच्या मागेच असलेल्या पेट्रोलजन्य साठ्यास आग लागल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. याठिकाणी आग लागली असल्याचा … Read more

धक्कादायक ! अंगणवाडी बालकांच्या पोषण आहारात निघाला मृत उंदीर पालक संतप्त

waluj

औरंगाबाद – राज्यभरात अंगणवाडीच्या माध्यमातून सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना पोषण आहार पुरवला जातो. मात्र औरंरगाबादमधील वाळूज परिसरातील एका अंगणवाडीतील बालकाला दिलेल्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळून आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्पाद्वारे या पोषण आहाराचा पंचनामा करण्यात आला. वाळूज गावातील अंगणवाडी क्रमांक 1 येथून लाभार्थी बालकांना 28 डिसेंबर रोजी पोषण आहाराची पाकिटं … Read more

अनोखी शक्कल ! टाचणीच्या मदतीने तीन लाखांची वीजचोरी; प्रकार पाहून महावितरणही चक्रावले

mseb

औरंगाबाद – वीज चोरीसाठी कोण काय करेल याचा नेम नाही. एका कारखान्यात चक्क टाचणीचा वापर करून तीन लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मंगळवारी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे महावितरण देखील चक्रावून गेले आहे. नारेगावातील सिसोदिया इंडस्ट्रियल इस्टेटमधील हिलाबी इंजिनिअरिंग वर्क्समध्ये प्लास्टिक बॉटल तयार केल्या जातात. महावितरणच्या चिकलठाणा एमआयडीसी … Read more

शेंद्रा एमआयडीसी परिसरातील प्लास्टिक ग्रॅन्युअल्स युनिटला भीषण आग

fire

औरंगाबाद – शेंद्रा एमआयडीसीतील एका प्लास्टिक दाणे (ग्रॅन्युअल्स) बनविणार्‍या युनिटला काल रात्री आठच्या सुमारास अचानक आग लागली. शेंद्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या अर्धातासात ही आग संपूर्णतः आटोक्यात आणली. दरम्यान, तोपर्यंत कच्चा व तयार माल आणि मशिनरी जळुन सुमारे दहा ते बारा लाख रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली. शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील सेक्टर डी मधील … Read more

वाळूज एमआयडीसी भागात गॅस सिलिंडरचा स्फोट; चार गंभीर जखमी

spot

औरंगाबाद – उद्योगनगरी वाळूज एमआयडीसी मधील प्रभाकर इंजीनियरिंग च्या समोरील शेडमध्ये दुचाकीच्या सायलेन्सरला वेल्डिंग करत असताना गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला असून, यात वेल्डर, दुचाकी चालक आणि इतर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान घडली. याविषयी अधिक माहिती अशी की, रांजणगाव चौकात असद चाऊस यांचे प्रभाकर इंजिनियरिंगचा समोर गॅस वेल्डिंगचे शेड … Read more

कंपनी व्यवस्थापकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

murder

औरंगाबाद – चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील अवनीश इंटरप्रायजेस कंपनीच्या व्यवस्थापकासह सुरक्षारक्षकावर पूर्ववैमनस्यातून एकाने धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. यामळे पुन्हा एकदा उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. . याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार सदर कंपनीच्या आवारात तीघेजण घुसले त्यांनी, सुरक्षारक्षक माणिक देवराव पहुरे (४४, रा.संजयनगर, मुकूंदवाडी) यांना आणि कंपनीचे व्यवसथापक जोशी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. … Read more