पंढरपुरात पोलिस ठाण्यातच मद्यपी पोलिसांचा डॉल्बीवर धिंगाणा

पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी मद्यपान करून डाॅल्बीवर डान्स केल्याचा प्रकार समोर आला आहे.

सोलापुरात देवाच्या रंगपंचमीला ही कोरोनाचा फटका ; रंगपंचमीला विठ्ठल-रुख्मिणीलाही रंग नाही

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात साजरी केली जाणारी रंगपंचमी यावर्षी कोरोना व्हायसरच्या भीतीने मंदिर समितीने रद्द केली आहे.

रंगपंचमीचा कार्यक्रम सातारा पोलिसांनी काढला ‘धुवून’ ; कोरोनामुळे ‘धून टाक’ कार्यक्रमाचा फज्जा (व्हिडीओ)

रंगपंचमी निमित्ताने साताऱ्यातील उत्साही युवक युवतींनी धुन टाक हा कार्यक्रम आयोजीत केला होता.

बावधनची बगाड यात्रा उत्साहात ; यात्रेच्या गर्दीवर दिसून आला ‘कोरोना’चा परिणाम (व्हिडीओ)

राज्य भरात रंगपंचमी विविध रंगांनी साजरी केली जाते. मात्र याच दिवशी सातारा जिल्ह्यातील बावधन हे गाव गुलाबी रंगानी न्हाहून निघते. कारण आहे या गावची ‘बगाड’ यात्रा..सध्या याच बगाड यात्रेवर कोराना व्हायरसचे सावट घोंगावल्यामुळे बगाड यात्रेला भाविकांची अल्पप्रमाणात गर्दी दिसून आल्याचं पाहायला मिळालं.

मिरजेतील ज्ञान प्रबोधिनीत मुलींना मार्शल आर्टचे प्रशिक्षण

मिरजेतील ज्ञान प्रबोधिनी विद्यालय येथे मुलींना मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन महापौर गीता सुतार यांच्या हस्ते झाले. याठिकाणी मुलीना  स्वसंरक्षनाचे दिले धडे दिले जाणार आहेत.

साताऱ्यातील ग्रामस्थांची अनोखी भूतदया ; अडचणीतील निलगायीची केली सुखरुप सुटका

माणसांपेक्षा प्राण्यांवर प्रेम करणारे लोक आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतात. अनेकदा तर अडचणीत असलेल्या प्राण्यांना वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणारे बहाद्दरही आहेत. अशीच एक घटना सातारा जिल्हातील वाळंजवाडी जंगलात पाहायला मिळाली.

सोलापुरात सावकाराच्या जाचाला कंटाळून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कर्जाची परतफेड करुनही वारंवार पैशासाठी तगादा लावल्याने या तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे.

खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचे दुचाकीवरून मेळघाट दर्शन ; टिकटॉक व्हिडीओ व्हायरल

अमरावती जिल्हाच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी होळी सणानिमित्त मेळघाटात सैर सपाटा केला होता.

होळीमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रतिकृतीचे दहन ; सांगलीत होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा

सांगलीसह संपूर्ण जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने मंगळवारी सायंकाळी होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Don’t worry…! कोणताही मेडिक्लेम असला तरी ‘कोरोना फ्री’ होणारचं

कोरोना  व्हायरसने देशासहित आता पुण्यात ही धुमाकूळ घातला आहे.  पुण्यातील पाच जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे आता पुण्यातील नागरिक भयभीत झाले आहेत.