विधानपरिषद बरखास्तीचा आंध्र प्रदेश सरकारचा निर्णय; विधानपरिषदेत संख्याबळ नसल्यामुळे घेतला निर्णय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आपल्या झुंजार पदयात्रांनी राज्यभर काढलेल्या दौऱ्यांतून आंध्रप्रदेशची सत्ता काबीज केलेल्या वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्या सत्ताधारी वायएसआर काँग्रेस सरकारने राज्य विधीमंडळातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. सोमवारी सकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वाएसआर काँग्रेसचे आमदार गुडीवडा अमरनाथ यांनी ही माहिती दिली. यापूर्वी मुख्यमंत्री वायएस जगन … Read more

कोल्हापूरात नाभिक समाजाचा अनोखा उपक्रम; प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे मोफत कापले केस

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेसरी गावातील नाभिक समाजाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. २६ जानेवारी या दिवशी विद्यार्थ्यांना टापटीपपणे शाळेत ध्वजारोहणासाठी जावं लागतं आणि म्हणूनच नेसरीतल्या नाभिक समाजाने २०० विद्यार्थ्यांचे मोफत केशकर्तन केले आहे. यामुळं नाभिक समाजाच नेसरीसह पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे. आज सकाळपासूनच गावातील नाभिक समाजाने शाळेसमोर जाऊन सर्व विद्यार्थ्यांचे मोफत केशकर्तन केले आहे.

महाराष्ट्रातील 54 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक; 10 अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक, पहा यादी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 10 पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक, 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदकतर 40 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहे. शौर्य पदक : मिठू नामदेव जगदाळे, सुरपत बावाजी वड्डे, आशिष मारूती हलामी, विनोद राऊत, नंदकुमार अग्रे, डॉ.एमसीव्ही महेश्वर रेड्डी, समीरसिंह साळवे, अविनाश कांबळे, वसंत अत्राम आणि हमीत डोंगरे. विशिष्ठ सेवा … Read more

कसोटी क्रिकेटमध्ये 5 लाख धावांचा टप्पा पार करणारी टीम बनली इंग्लंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : इंग्लंड क्रिकेट संघ कसोटीत 500,000 धावा करणारा जगातील पहिला संघ बनला आहे. जोहान्सबर्गच्या वँडरर्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात इंग्लंडने हे कामगिरी केली. इंग्लंडने त्यांच्या 1022 व्या कसोटी सामन्यात हा विक्रम केला आहे. त्याचबरोबर 830 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया 432,706 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि भारत 540 कसोटी सामन्यात … Read more

बाबांच्या 10 टक्के काम करता आलं तरी खूप : अमित ठाकरे

हॅलो महराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाधिवेशन मुंबईत सुरु आहे. या अधिवेशनात राज पुत्र अमित ठाकरे यांना राजकारणात लाँच करण्यात आले आहे. अमित ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मला कुणाशीही स्पर्धा करायची नाही. सध्या तरी माझी स्पर्धा फक्त माझ्या वडिलांशी आहे. त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कामाच्या 10 टक्के काम मला … Read more

साई जन्मभूमीचा वाद आता उच्च न्यायालयात जाणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या साई बाबा यांच्या जन्मभूमीचा वाद अजून थांबायच नाव घेत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्ती नंतर देखील पाथरी ग्रामास्थांचे समाधान झालेले नाही. आता या प्रकरणाचा वाद उच्च न्यायालयात गेला आहे. साई जन्मभूमी पाथरी संस्थानने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयात हा जन्मभूमी वाद गेल्यामुळे हे … Read more

प्रिय ट्रोलर्स, तुम्ही कितीही खोटं बोललात तरी ‘छपाक’ यशस्वी झालाय..!! पहा सविस्तर आकडेवारी

प्रिय ट्रोलर्स, तुम्ही कितीही खोटं बोललात तरी ‘छपाक’ यशस्वी झालाय..!! पहा सविस्तर आकडेवारी

पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच मिळून एकच पुस्तक; बालभारतीचा प्रस्तावित निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी बालभारतीने महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयाच मिळून एकच पुस्तक आणण्याचा प्रस्ताव बालभारतीने मांडला आहे. बालभारतीचा हा प्रस्तवित निर्णय आहे. यावर शिक्षण मंत्रालय सकारात्मक भूमिका घेणार का याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. विद्यार्थी आणि पालकांमधून मात्र या प्रस्तावावित निर्णयाचं मोठ्या … Read more

आपचा आमदार फुटला, राष्ट्रवादीमध्ये केला प्रवेश; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, दिल्ली अभी दूर नहीं…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आम आदमी पक्षावर नाराज असलेले आमदार फतेह सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच कमांडो सुरिंदर सिंह यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन यांच्या उपस्थितीत आमदार फतेहसिंह आणि कमांडो सुरिंदरसिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात … Read more