कोरोना पोहोचला संसदेत? कोरोनाग्रस्त कनिका कपूरच्या संपर्कात आला होता ‘हा’ खासदार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गायिका कनिका कपूरला करोनाची लागण झाली आहे. कनिकाने स्वतः आपल्या सोशल मीडियावरून कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याची कबुली दिली आहे. कनिका लंडनहून लखनऊला आली होती. त्यानंतर लखनऊमध्ये एका हाय प्रोफाइल पार्टीमध्ये तिने हजेरी लावली होती. माजी खासदार अकबर अहमद डंपी यांच्या लखनऊ येथील निवासस्थानी ही हाय प्रोफाइल पार्टी झाली होती. अनेक बडे … Read more

संसदेतील गदारोळामुळे अध्यक्ष ओम बिर्ला दुसर्‍या दिवशीही राहिले लोकसभेत गैरहजर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली हिंसाचारासंबंधी सभागृहात चर्चा करण्याच्या मुद्द्यावरून लोकसभेत अजूनही गदारोळ सुरु आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला सभागृहात विरोधी पक्षांकडून होत असलेला गोंधळ आणि महिला खासदाराशी गैरवर्तनामुळे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान मंगळवारी झालेल्या गदारोळानंतर ते काल बुधवारी संसदेत पोहोचले मात्र त्यांनी सभागृहात प्रवेश केला नाही. आज गुरुवारी सलग दुसर्‍या दिवशीही सुद्धा … Read more

दिल्लीतील गोळाबारीच्या घटनांवरून अनुराग ठाकूर यांच्या विरोधात संसदेत जोरदार घोषणाबाजी

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी भाषण करताना भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ”देश के गद्दारो को, गोली मारो..” अशा चिथावणीखोर घोषणा दिल्या होत्या. दरम्यान मागच्या ३ दिवसांत दिल्लीत जामिया मिलिया विद्यापीठाचा परिसर आणि शाहिनबाग परिसरात झालेल्या गोळीबारीच्या घटनामुळं विरोधकांनी भाजपाला जबाबदार धरलं आहे.

संसदेत पुन्हा खडाजंगी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडणार

मागील सहा दशकांपासून लागू असलेल्या नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करण्यासाठीचे विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दुपारी लोकसभेत मांडतील आणि ते संमत करण्याच्या दृष्टीने त्यावर चर्चा करण्यात येईल, असे लोकसभेच्या सोमवारच्या कामकाजपत्रिकेत म्हटले आहे.

ज्येष्ठांची काळजी घेण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय

कौटुंबिक कलहामधून वृद्ध आई वडिलांना वृध्दाश्रमामध्ये जाऊन राहावे लागत असल्याची बरीच प्रकरणे सर्वांना माहीतच असतील. आपल्या उतरत्या वयामध्ये जेष्ठांना अश्या प्रकारे वागणूक मिळाल्यामुळे त्यांना पुढील आयुष्य अत्यंत हलाखीचे जगावे लागते. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नागरिक कल्याण आणि देखभाल कायदा २००७ हा कायदा आला होता. त्याच्या परिभाषेमध्ये बदल करत आता केंद्र सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यानुसार कायदाबदल करत घरातल्या बुजुर्गांची काळजी घेण्याची जबाबदारी मुलांबरोबरच जावई आणि सुनांवरही असेल, असा प्रस्ताव आहे. सरकार Maintenance and Welfare Senior Citizens Act 2007 मध्ये असलेल्या ज्येष्ठांची काळजी घेण्याच्या परिभाषेत बदल करणार आहे. ही परिभाषा अधिक विस्तारित करायचा सरकारचा विचार आहे.

संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी गिरीश बापट यांची नियुक्ती

दिल्ली प्रतिनिधी । संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला यांनी नियुक्ती केली.या समिती मध्ये लोकसभेमधील ३० सदस्य असणार आहेत. विधानसभेतील व राज्य मंत्रीमंडळातील असलेला प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांची ही निवड करण्यात आली आहे. संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी आज माझी नियुक्ती करण्यात आली.लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला यांनी नियुक्ती केली.या … Read more