महाबळेश्वरातील बंगल्यामुळे शंभूराज देसाई अडचणीत : मंत्रीपद जाणार की राहणार?

Shamburaj Desai

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एनआयटी भूखंड विक्री प्रकरणी आरोप करण्यात आला. आतापर्यंत शिंदे-फडणवीस सरकारमधील 5 मंत्र्यांवर आरोप करण्यात आले आहेत. अब्दुल सत्तार, संजय राठोड यांच्यानंतर आता सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व उत्पादन शुल्क … Read more

अभिमानस्पद! साताऱ्याच्या सुपुत्राने बनवलं भारतीय बनावटीचे पाहिलं विमान; सरकार देणार 12 कोटी

Indian-Made Aircarft

कराड | भारतीय बनावटीचे पहिले विमान तेही सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राचे लवकरच पहायला मिळणार आहे. ढेबेवाडी विभागातील अमोल यादव यांच्या विमान निर्मितीच्या पुढील संशोधनासाठी 12 कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या बैठकीत घेतला आहे. याबाबतची माहिती स्वतः अमोल यादव यांनी दिली आहे. पाटण तालुक्यातील सळवे येथील कॅप्टन अमोल यादव यांचे मूळ गाव आहे. भारतीय बनावटीचे पहिले … Read more

सातारा जिल्ह्यात ‘या’ गावात 26 वर्षीय तरूणाची थेट सरपंचपदी बाजी

Young Sarpanch Satara District

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी ताईगडेवाडी- तळमावले (ता. पाटण) ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीसाठी थेट जनतेतून सरपंच पदासाठी कै. बाजीराव यादव यांचे सुपुत्र सुरज बाजीराव यादव यांनी 554 मते मिळवत बाजी मारली. तळमावले ग्रामविकास पॅनेलच्या सौ. सोनाली जाधव, सौ. सीमा यादव व श्री. सुहास गुजर हे सदस्य पदी विजयी झाले. विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची … Read more

तारळे भागात तीन पानी जुगार खेळणाऱ्या 5 जणांवर गुन्हा

jugar

कराड | धनगरवाडी (ता. पाटण) येथे तीन पानी जुगार खेळणाऱ्या 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तारळे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक यांना गोपनीय बातमीदारामार्फत जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रोख रक्कम 20 हजार 850 रूपये, मोबाईल व जुगारातील साहित्य जप्त केले आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मौजे … Read more

खासदारांच्या गावात राष्ट्रवादीची बाजी : आ. शंभूराज देसाई गटाचा पराभव

Shrinivas Patil & Shamuraj Desai

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणा-या मारूल हवेली ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादीने झेंडा फडकवला आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या गावात राष्ट्रवादी पक्षाने बाजी मारली. सरपंच पदासह 7 जागांवर विजय मिळवत पालकमंत्री आ. शंभूराज देसाई यांच्या गटाचा धुव्वा उडवला आहे. मारूल हवेली हे खा.श्रीनिवास पाटील यांचे गाव असल्याने ह्या निवडणूकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष  … Read more

अनैतिक संबंधातून पन्नाशीतल्या एकाचा खून : आरोपीस अटक

Patan Murder

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके भैरेवाडी (ता.पाटण) येथील सीताराम बबन देसाई (वय- 49) यांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी त्याच गावातील नारायण तुकाराम मोंडे (वय- 55) यास काल रात्री अटक केली. हा खून अनैतिक संबंधाच्या संशयातून केल्याची कबुली अटकेतील मोंडेने दिली आहे. भैरेवाडी येथे सीमाराम बबन देसाई हे कुटुंबीयांसमवेत राहण्यास होते. शुक्रवारी (ता. 9) रात्री जेवण करून मळी नावाच्या … Read more

पाटण तालुका खरेदी -विक्री संघ निवडणूक बिनविरोध : पाटणकरांचे निर्विवाद वर्चस्व

Election of Patan

पाटण | राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडीमध्ये संस्था सभासद प्रतिनिधी पुढीलप्रमाणे ः- प्रतापराव शिवाजीराव काळे (मालदन), अविनाश रामचंद्र जानुगडे (जानुगडेवाडी), प्रमोद दादासो देसाई- देशमुख (भोसगांव), रामचंद्र यशवंत … Read more

निवडणूक : कराड- पाटण शिक्षक सोसायटीसाठी 21 जागांसाठी तब्बल 289 अर्ज दाखल

Karad-Patan Teachers Society

कराड | कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत 21 जागांसाठी तब्बल 289 अर्ज दाखल झाले आहेत. आज अर्ज छाननी होणार असून 1 डिसेंबर पर्यंत अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे. त्यामुळे 2 डिसेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संदिप जाधव यांनी दिली आहे. कराड- … Read more

रयत क्रांतीच्या पाठपुराव्यामुळे बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला

Rayat Kranti

कराड | कराड- हेळवाक महामार्गाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. पाटण तालुक्यातील विहे गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमिनीचा मोबदला जमा करण्यात आला आहे. चार वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले होते, मात्र, शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला नव्हता. तेव्हा शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर रयत क्रांती संघटनेच्या वतीने कृष्णत क्षीरसागर यांनी उपविभागीय अधिकारी पाटण यांच्याकडे पाठपुरावा केला होता, … Read more

शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश रविवारी सदस्य राष्ट्रवादीत स्वगृही परतले

कराड | पाटण मतदारसंघातील वसंतगड (ता. कराड) या गावातील ग्रामपंचायतच्या सदस्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई गटातील पक्ष प्रवेशानंतर काही तासातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाटणकर गटात स्वगृही परतले आहेत. त्यामुळे पाटण व कराड तालुक्यात वसंतगड गावचे राजकारण चांगलेच चर्चेत आले आहे. गावातील स्थानिक राजकीय कुरघोडीतून हा प्रकार घडला होता. यामध्ये आर. वाय. नलवडे दादाच सदस्यांच्या पुनः पक्ष … Read more