उंब्रजमध्ये वीज पडल्याने जमिनीत दोन फूटाचा गोल खड्डा : लोकांची पाहण्यासाठी गर्दी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी तालुक्यातील उंब्रज येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीच्या आवारात बुधवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कडकडाट करत वीज पडली. या विजेमुळे जमिनीत सुमारे दोन फूट खोल खड्डा पडला. या प्रकारानंतर घटनास्थळी पडलेला खड्डा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळावरू मिळालेली माहिती अशी, बुधवारी उंब्रज व परिसरात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह … Read more

वादळी वाऱ्यासह पाऊस : मायणीत भिंत कोसळल्याने 6 जखमी, गाड्याचेंही नुकसान

सातारा | सातारा जिल्ह्याला रविवारी वादळी वाऱ्यासह झोडपले. या पावसामुळे मायणी येथे बाजार पटांगण शेजारी खाजगी मालकाच्या बंद घराची भिंत कोसळून 6 जण जखमी झाले आहेत. तर मायणीतच बसस्थानकात एक मोठे झाड कोसळल्याने अनेक दुचाकीचे नुकसा झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजूनही काही दिवस सातारा जिल्ह्यात पावसा सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, खटाव, माण तालुक्याला वादळी … Read more

कृष्णा- कोयनेची पाणीपातळी वाढू लागली : आज पुन्हा कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविणार

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून पाणीपातळीत झपाट्याने वाढ होवू लागल्याने सलग दुसऱ्या दिवशी 4 फुट 9 इंचावर धरणाचे वक्र दरवाजे उचलण्यात येणार आहेत. धरणाच्या वक्र दरवाजातून प्रतिसेकंद एकूण 45 हजार क्युसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात काही वेळात सोमवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून सोडण्यात येणार आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे … Read more

कोयनेत पावसाचा जोर वाढला : धरणातून 23 हजार 910 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून पाणीपातळीत झपाट्याने वाढ होवू लागल्याने दुपारी 1 फुटांवर उचलेले धरणाचे वक्र दरवाजे अडीच फुटावर करण्यात आले आहेत. धरणात प्रतिसेकंद सरासरी 23 हजार 910 क्युसेक्स पाण्याची आवक असून वक्र दरवाजातून प्रतिसेकंद 22 हजार 730 क्युसेक्स व पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्युसेक्स असे प्रतिसेकंद … Read more

कोयना धरण : आज 10 हजार क्युसेस पाणी नदीपात्रात सोडणार, दरवाजे दुसऱ्यांदा उचलणार

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या पाटण तालुक्यातील कोयना धरणात चालू वर्षी पावसाचा जोर वाढलेला असून विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे. धरण क्षेत्रात आज दि. 12 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 103. 19 टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे धरणातून आज रविवारी दुपारी 2 वाजता धरणांची वक्र दरवाजे 1 फुटांनी उचलून 10 हजार … Read more

कोयना धरणाचे सर्व दरवाजे बंद : धरणात 85.88 टीमसी पाणीसाठा, पावसाचा जोर ओसरला

Koyana Dam 1

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या काही दिवसात मुसळधार झालेल्या पावसाने कोयना धरण क्षेत्रात पाणीपातळी वाढल्याने कोयना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. अखेर आज बुधवारी सकाळी दि. 4 रोजी 9 वाजता कोयना धरणातून सर्व वक्री दरवाजे 13 दिवसांनी बंद केल्याने पाण्याचा विसर्ग बंद झाला आहे. धरणक्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाचे सर्व 6 … Read more

पूरग्रस्तांना मदत : कराड शहरात इंद्रजित गुजर मित्र परिवाराकडून आ. पृथ्वीराज चव्हाण याच्या हस्ते अन्नधान्य वाटप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मुसळधार झालेल्या पावसाने लोकांचे मोठे नुकसान केले आहे. या संकटातून पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी सामाजिक संस्था व व्यक्ती यांनी काम करणे गरजेचे आहे. नगरसेवक इंद्रजित गुजर यांनी पाटण काॅलनीतील लोकांना मदत करून एक सामाजिक आदर्श पुढे ठेवला आहे. पुरामुळे अनेकांचे नुकसान झालेले आहे, अनेकांचे संसार वाहून गेलेले आहेत. अशा परिस्थितीत राज्य … Read more

कराड नगरपालिकेकडून स्थलांतरित लोकांची अवहेलना, गैरसोयी असताना पूरग्रस्तांना शाळेतून बाहेर काढले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्याला गेल्या काही दिवसात पावसाने झोडपले आहे. जिल्ह्यात पडत मुसळधार पावसाचा तडाखा कराड शहरालाही बसलेला आहे. कराड शहरातील पाटण काॅलनीत झोपडपट्टीत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. या भागातील लोकांना काही दिवस नगरपालिकेने नगरपालिकेच्या शाळेत स्थलांतरीत केले होते. परंतु झोपडपट्टीतील लोकांना स्थलांतरीत ठिकाणावरून गैरसोयी असताना पुन्हा झोपडपट्टीत पाठवले आहे. … Read more

काले गावातील पूरग्रस्तांना सातारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून अन्नधान्यांचे किट वाटप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील काले या गावात आलेल्या महापुरामुळे गावातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेक घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तेजस शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काले गावातील तब्बल 80 पूरग्रस्त कुटुंबाना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. यावेळी तेजस शिंदे म्हणाले, दक्षिण मांड नदीला … Read more

सातारा जिल्ह्यातील बाधित कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणेबाबत बैठक संपन्न

सातारा | गेल्या आठ दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत तसेच बाधित कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणेबाबत व त्यांच्या अडचणी सोडवणेबाबत चर्चा झाली. सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टी व भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, तात्पुरत्या – कायमस्वरूपी उपाययोजना व पुनर्वसन या अनुषंगाने राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. … Read more