ऐट राजाची वागणुक भिकाऱ्याची अशी सरकारची अवस्था, सदाभाऊंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भाजपश इतर पक्षांतील नेत्यांकडून वारंवार निशाणा साधला जातोय. आता माजी मंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ” महाविकास आघाडी सरकारने मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या शेतात गाढवाचा नांगर फिरविला आहे. ऐट राजाची वागणुक भिकाऱ्याची अशी सरकारची अवस्था झाली असल्याची … Read more

राज्य सरकारविरोधात एफआरपी मुद्यांवर करणार आंदोलन ; सदाभाऊ खोत आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्याना कारखान्यांकडून एफआरपीची रक्कम दिली जात नसल्याने याविरोधात राज्य सरकरांकडूनही काहीच कारवाई होत नसल्याचे दिसते. दरम्यान या विरोधात आता माजी मंत्री तथा रयत क्रांती शेतकरी सन्घटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. 5 ऑक्टोबर पासून सोलापूर जिल्ह्यातून राज्य सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा खोत यांनी दिला आहे. राज्यातील … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : माजी खासदार राजू शेट्टी आणि डाॅ. सुरेश भोसले यांची भेट

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जयसिंगपूर येथील शिवार कोविड सेंटर येथे डॉ. सुरेश भोसले यांनी माजी खासदार शेट्टी यांची भेट घेतली. यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा सहा वर्षांच्या कारकिर्दीत केलेल्या प्रगतीचा लेखाजोखा असणारा ‘समृद्धीचा कृष्णा पॅटर्न’ ही पुस्तिका भेट दिली. तेव्हा राजू शेट्टी यांनी त्यांची प्रशंसाही केली. यावेळी पै. आनंदराव मोहिते, संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष देवानंद … Read more

शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्यांच्या मागे हे सरकार उभे : राजू शेट्टी यांची राज्यसरकारवर घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘ शेतकऱ्यांची वीज तोडणी व उसाच्या थकीत बिलाबाबत आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. राज्यातील सव्वा कोटी वीज ग्राहकांचे तीन हजार कोटींचे बिल माफ करणे शासनाला अशक्य नव्हते. मात्र शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्यांच्या मागे हे सरकार उभे राहिले आहे., अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्यसरकारवर केली. स्वाभिमानी शेतकरी … Read more

गोकुळच संचालक व्हायचं मग काढून दाखवा दहा लिटर दूध : राजू शेट्टींचं खुलं चॅलेंज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मात्तबर नेत्यांची धावपळ सुरु झालीय. कुणी प्रत्यक्ष तर कुणी छुप्या पद्धतीनं आपली रणनिती आखत आहेत. गोकुळच्या निवडणुकीत आकर्षणाच्या ठिकाणी दोनच नेते आहेत. तर गोकुळमधील विरोधक एक एक नेता विरोधी पॅनलमध्ये म्हणजे राजर्षी शाहू विकास आघाडीत घेत आहेत. तर सत्ताधारी प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन आपली सत्ता भक्कम … Read more

सेलिब्रिटींच्या ट्विटच्या चौकशीसोबत त्यांच्या आर्थिक भानगडी बाहेर काढाव्यात; राजू शेट्टींची मागणी

सांगली । ”सेलिब्रिटींकडून देशभक्ती शिकण्याची वेळ आमच्यावर आलेली नाही. सरकारनं जरुर त्यांनी चौकशी करावी. त्याचबरोबर त्यांची आर्थिक चौकशीही करुन त्यांच्या आर्थिक भानगडी बाहेर काढाव्यात”, अशी मागणी माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. सेलिब्रिटींच्या ट्वीटवरुन जोरदार राजकारण रंगलेलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी आज इंदापूरात बोलत होते. ”सगळेच तथाकथित सेलिब्रिटी सरकारचं … Read more

कृषी कायद्यांच्या विरोधात महाराष्ट्रातही ‘ट्रॅक्टर मोर्चा; राजू शेट्टींची घोषणा

कोल्हापूर । अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी आझाद मैदान येथे दाखल झाला. मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात विविध वाहनांतून हजारो शेतकरी मुंबईत आंदोलनात दाखल झाले असून, सोमवारी जाहीर सभेने शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने निघणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सांगलीतून ट्रॅक्टर मोर्चा काढून या आंदोलनात सहभागी होत असल्याचे … Read more

‘घरगुती लाईट कनेक्शन तोडून तर दाखवा!’ वीज बिलांवरून राजू शेट्टींचा सरकारला ‘पॉवरफुल’ इशारा

कोल्हापूर । माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahaviaks Aaghadi) सरकारवर हल्लाबोल केला आहे “लॉकडाऊन काळातील लाईट बिलांवर, तीन महिन्याची सवलत देण्याचं आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी सांगितले होते. मात्र दिवाळीनंतर गोड बातमी देण्याची ऊर्जामंत्र्यांची घोषणा हवेत विरली”, असा घणाघात राजू शेट्टी … Read more

सुप्रिम कोर्टाच्या आडून कृषी कायदे शेतकर्‍यांच्या बोकांडी बसवण्याचा सरकारचा डाव? – राजू शेट्टी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा निर्णय दिला. यांनंतर कृषी कायद्यांची पुनरस्थापना करण्यासाठी सुप्रिम कोर्टाने एक समिती गठीत केली. मात्र या समितीत कृषी कायद्याचे समर्थन करणार्‍यांनाच स्थान दिल्याने शेतकरी वर्गात अंसंतोष दिसत आहे. यापार्श्वभुमीवर अंदानी, अंबाणीला अजून काही या कृषी कायद्यात दुरुस्ती करुन घ्यायची आहे ती … Read more

‘शेलारांची अवस्था ‘पिंजरा’ सिनेमातील मास्तरांसारखी!’; राजू शेट्टींचा ‘इट का जवाब पथ्थर’

कोल्हापूर । ‘राजू शेट्टींवर विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे वाजवण्याची वेळ आली आहे,’ अशी टीका करणाऱ्या भाजप नेते आशिष शेलारांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आशिष शेलार यांची स्वत:ची अवस्था ‘पिंजरा’ सिनेमातील मास्तरांसारखी झाली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदासाठी शरद पवारांचे पाय चाटण्यासाठी कोण गेले होते? असा सवाल शेट्टी यांनी केला. … Read more