बेपत्ता झालेल्या युवकाचा अंकली मध्ये सापडला मृतदेह

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे  तीन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या युवकाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून पत्नीची छेड काढत असल्याच्या रागातूनच हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. बाळू उर्फ विकी मलमे असे त्या मयत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मयत बाळू हा दिनांक १३ रोजी सकाळी बेपत्ता झाला होता. त्याच्या घरच्यांनी … Read more

११ तोळे सोन्यावर चोरांनी मारला डल्ला

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे , तासगाव तालुक्यातील येळावी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन-तीन घरांत घरफोडी केली. अशोक आत्माराम मारवाडी यांच्या घरातील अंदाजे ११ तोळ्यांचे सोन, चांदीचे दागिने आणि १५ हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. तसेच इतरही दोन, तीन घरांत चोरीचा प्रयत्न केला आहे. याबाबत रात्री ऊशिरा तासगाव पोलिसांत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु … Read more

दोन गटात वाद ; १३ जणाच्याविरोधात पोलीसात गुन्हा दाखल

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे, खानापूर तालुक्यातील कुर्ली येथील दोन गटांत जोरदार राडा झाला. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी विटा पोलिस ठाण्यात फिर्यादी दिल्या आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांतील १३ जणांविरूध्द विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी लक्ष्मण शिंदे आणि सुरज कुंभार यांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत.  या राड्याप्रकरणी एका गटातील सुरज कुंभार, अमित उर्फ … Read more

सराईत गुन्हेगाराने घरात घुसून महिलेवर केले तलवारीने वार

Untitled design

सांगली प्रतिनिधी |कुपवाड शहरातील रेकाॅर्डवरील गुन्हेगाराने अनैतिक संबंध असणाऱ्या महिलेच्या आईजवळ असलेल्या मुलाला बळजबरीने ओढून घेऊन जाताना विरोध करणा-या परवीन आसंगी या महिलेवर तलवारीने वार केले आहेत. सराईत गुन्हेगार अमर जाधव याने आपल्या प्रेमीकेच्या आईवर डोक्यात तलवारीचे वार केल्याने ती महिला जखमी झाली आहे. हल्ल्यानंतर आरोपी  फरार झाला आहे. गुन्हेगार अमर जाधव याच्याविरोधात कुपवाड पोलिसात गुन्हा … Read more

चारित्र्यावरील संशयातून खूनी हल्ला करणाऱ्या पतीला सक्त मजुरीची शिक्षा

Untitled design

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिच्यावर चाकूने हल्ला करून तिच्या खुनाचा प्रयत्न करणारा नराधम पती सुरेश बापू कांबळे यास अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. एस.एस.सापटणेकर यांनी ७ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रु.दंडाची शिक्षा सुनावली. ‘सदरचा गुन्हा कानडवाडी ते कुपवाड एमआईडीसी रस्त्यावर १२ जुलै २०१६ रोजी घडला होता.यातील फिर्यादी सौ.सविता सुरेश … Read more

तासगाव बसस्थानकामध्ये तरुणांची रंग खेळत हुल्लडबाजी

Untitled design

हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना तासगाव पोलिसांनी घडवली अद्दल सांगली प्रतिनिधी तासगाव येथील बसस्थानकामध्ये रंगपंचमी खेळताना हुल्लडपणा करत प्रवाशांच्या अंगावर रंग टाकणाऱ्या दहा महाविद्यालयीन तरुणांवर तासगाव पोलिसांनी आज कारवाई करत चांगलीच अद्दल घडवली. युवकांना ताब्यात घेत समज देऊन सोडण्यात आले. अधिक माहिती अशी की, सकाळी साडे दहाच्या सुमारास काही महाविद्यालयातील तरुण तासगाव शहरातील विविध भागांमधून रंगाची पोती … Read more

मिरजेत आयपीएस अधिकारी संदीप गिल यांची धडाकेबाज कामगिरी

Untitled design

मटका अड्ड्यावर टाकला छापा : ४ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल केला जप्त. सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरजेतील आदर्श कॉलनी पंढरपुररोड राहणारा शिराज दादापीर कोतवाल हा त्याच्या राहत्या घरात बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर बेकायदा मोबाईलवरून बेकायदा मटका घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गिल यांच्या पथकाने छापा टाकून आठ जणांना अटक केली … Read more

मुलाची काळजी घेतानाच आईवर काळाचा घाला

Untitled design

  कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडच्या कृष्णा नाक्यावरील सिंदल हॉस्पिटल समोरील चौकात डंपरखाली सापडून महिला जागीच ठार झाली. सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मनीषा संजय पाटोळे (वय ४७, रा. बनवडी फाटा, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, अपघातानंतर डंपर चालक पसार झाला आहे. बनवडी फाटा येथे राहणाऱ्या … Read more

खाजगी सावकारीच्या जाचातून एकाची रेल्वेखाली आत्महत्या : सांगलीत खळबळ

Untitled design

पुणे, सोलापूर, सांगली येथील ११ सावकारांवर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे खाजगी सावकारीच्या जाचाला कंटाळून आटपाडी तालुक्यातील घाणंद येथील शिवाजी कदम यांनी सांगलीतील भरती हॉस्पिटलच्या मागे असणाऱ्या रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवाजी कदम यांनी पाच मार्च रोजी सायंकाळी मिरज ते सांगली जाणाऱ्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या … Read more

लोकसभा निवडणूकीसाठी सांगली पोलीस दल सज्ज : गुंडांविरोधात ऍक्शन प्लॅन तयार

Untitled design

  सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे आगामी लोकसभा निवडणूकीसाठी सांगली पोलीस सज्ज झाले आहेत. लोकसभा निवडणूक कामासाठी सर्वात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून निवडणूक शांततेतच पार पडणार आहे. यात कोणालाही कशाही प्रकारची सूट दिली जाणार नाही तसेच येणाऱ्या निवडणुका या भीतीने नाही तर उत्सवाप्रमाणे पार पडतील असा विश्वास सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी … Read more