येथील गुंतवणूक आणि बॉलीवूड दुसरीकडे नेण्यासाठी मुंबईला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे का?- शिवसेना

मुंबई । सुशांतसिंह प्रकरणात बॉलिवूडमधील बड्या घराण्यांवर आरोप केल्यानंतर कंगना राणावत हीने मुंबई शहराबाबत आक्षेपार्ह्य विधान केलं. मुंबई पोलिसांची मला गुंडांपेक्षा जास्त भीती वाटते. मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?,’ असे ट्वीट कंगनानं केले होते. त्यावरून तिच्यावर चहू बाजूंनी टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबईची … Read more

मंदिरांच्या मुद्द्यावरून भाजपचा ठाकरे सरकारवर घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोनाच्या महासंकटामुळे लॉकडाऊन असलेलं महाराष्ट्र एकीकडे हळू हळू अनलॉक होत असताना दुसरीकडे मात्र भविरोधी पक्ष भाजपने मंदिरं उघडण्याची मागणी ठाकरे सरकारला केली. या मागणीसाठी भाजपा रस्त्यावर उतरलं आहे. यामुळे कोरोनाचं संकट बाजूलाच पण सत्ताधारी आणि विरोधक असं सत्तानाट्य महाराष्ट्र पाहत आहे. कोरोनासारख्या जीवघेण्या संकटामध्ये भाजपने राज्यभर मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी घंटानाद … Read more

शिवसेनेने केली गांधी कुटुंबीयांची पाठराखण ; महाराष्ट्रातील ‘बड्या’ नेत्यावर साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात महाविकासआघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून शिवसेनेने खूप वेळा सोनिया आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाचे कौतुक केले होते. आता पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्षपदाच्या संदर्भात शिवसेनेने पुन्हा एकदा गांधी कुटुंबीयांची पाठराखण केली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधील २३ ज्येष्ठांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवून पक्षनेतृत्त्वाविषयी शंका उपस्थित केली होती. या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस नेते … Read more

‘हे’ आहेत राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

मुंबई | महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय आज घेण्यात आले. शेती, दुग्धविकास, मासेमारी, नगरविकास, सार्वजनिक वाहतूक आणि परिवहन, लॉकडाऊनचे निर्बंध कमी करणे याबाबत काही निर्णय आज घेण्यात आले. वार्षिक कर भरणाऱ्या सार्वजनिक आणि मालवाहतुक गाड्यांना 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर काळापर्यंत करमाफी मिळणार आहे. राज्यातील मच्छीमारांना अनुदान देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय … Read more

MPSC परीक्षा पुन्हा पुढे ढकलली; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

MPSC

मुंबई । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती मुख्य सचिवांनी दिली आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे. करोना संकट टळलं नसल्याने एकीकडे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना … Read more

शिवसेनेने केली चेतन चौहान यांच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशीची मागणी

लखनऊ । उत्तर प्रदेश शिवसेनेने भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशातील मंत्री चेतन चौहान यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. चेतन चौहान यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनाने निधन झाले होते. दरम्यान, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. “मंत्री चेतन चौहान यांना लखनऊमधील एसजीपीजीआय … Read more

अखेर शंकरराव गडाखांनी केला शिवसेनेत प्रवेश; उद्धव ठाकरेंच्या हस्ते बांधले शिवबंधन

मुंबई । जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (shankarrao gadakh) यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. आज दुपारी शंकरराव गडाख यांनी मातोश्री येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनतर उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या हस्ते त्यांनी शिव बंधन बांधून घेत अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. नगर जिल्ह्यातील नेवासा मतदार संघात … Read more

राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मुंबईत तुफान ‘बॅनरबाजी’

मुंबई । अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना मुंबईत शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेने मुंबईतील विविध भागांमध्ये रस्त्यांवर होर्डिंग्ज लावली आहेत. यामध्ये ‘गर्जना साहेबांची, स्वप्नपूर्ती हिंदूंची’ अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे. वरळी, दादर, पवईसह विविध ठिकाणी शिवसेनेकडून ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. याबाबतचं वृत्त ‘झी २४’ वृत्तवाहिनीने … Read more

”जिनके घर शीशेके बने होते है…वो…डायलॉग म्हणतं संजय राऊतांच्या विरोधकांना टोला

नवी दिल्ली । राज्यात विरोधी पक्षांत असलेल्या भाजपाने गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारला टीकेच्या धारेवर धरलं आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशी, राम मंदिर यासारख्या मुद्द्यांवर भाजपा सातत्याने शिवसेनेवर टीका करत आहे. शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि सामना या वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी एक सूचक ट्विट … Read more

शिवसेनेची वचनपूर्ती! राम मंदिर निर्माणासाठी अशी केली मदत

मुंबई । अयोध्येत ५ ऑगस्टमध्ये राम मंदिराचे भुमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर जाणार उभारणीच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. राम जन्मभूमी आंदोलनातील अनेक मान्यवरांना या भूमिपूजनाचे निमंत्रण दिले आहे. मात्र , शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भूमिपूजनाचे आमंत्रण न मिळाल्याने वाद निर्माण झाला होता. दरम्यान शिवसेनेने राम मंदिर निर्माणासाठी … Read more