‘मी राहुलभाऊ समर्थक’ लिहिलेले टी-शर्ट घालून युवकाची आत्महत्या

‘मी राहुलभाऊ समर्थक’ नावाचे टी-शर्ट घालून एका तरुणाने आत्महत्या केल्याने बुलडाणा सह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धाड येथे ही घटना घडली असून सतीश मोरे (२१) असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय पक्षाचे टी-शर्ट घालून आत्महत्या करण्याची या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.

धक्कादायक! दसऱ्याच्या दिवशीच पती-पत्नीने केली आत्महत्या

आजच्या काळात माणसाला जगण्यापेक्षा मृत्यू सोपा वाटू लागला आहे. आयुष्यात जगण्यासाठीची धडपड करण अवघड वाटू लागल की आत्महत्या हा पर्याय बाकी राहतो. यवतमाळ जिल्ह्यामध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीच्या आत्महत्येची बातमी कळातच पत्नीने देखील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

अमरावतीत माॅलवरून उडी मारत तरुणीची आत्महत्या, आत्महत्येचं कारण अजून अस्पष्ट

रुपाली ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. शहरातील बियाणी चौकातील नेक्स्ट लेव्हल मॉल हा लोकांची वर्दळ असणारा मॉल आहे. रुपालीने या मॉलच्या पाचव्या माळ्यावरून रूढी घेतली. यात तिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. रुपालीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं.पदवी परीक्षेत नापास झाल्याने, आलेल्या नैराश्यामुळं तीने ही आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.

धक्कादायक ! २४ तासात ४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

बुलडाणा प्रतिनिधी| बुलडाणा जिल्ह्यातील धाड या गाव शिवारात कर्जबाजारीपणाला कंटाळून  ४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आल्या आहेत. गेल्या २४ तासांच्या अवधीत शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्येमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्यात एकीकडे निवडणुकीची रणधूमाळी सुरु झाली आहे. तेव्हा निवडणुकांवर लाखो रुपये खर्च केल्या जात असताना दुसरीकडे आर्थिक विवंचनेतून शेतकरी आत्महत्या करीत असल्याच चित्र सध्या जिल्हयात दिसत … Read more

बार्शीत एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

सोलापूर प्रतिनिधी। सोलापूरमधील बार्शी शहरात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अलिपूर रोडवरील ज्ञानेश्वर मंदिर परिसरात हा हादरवणारा प्रकार घडलाय. मृतांमध्ये पती, पत्नी, अल्पवयीन मुलगा आणि मुलीचा समावेश आहे. भैरवनाथ शिवाजी कोकाटे यांनी आपल्या कुटुंबीयांसहीत आत्महत्या केली. भरदिवसा ही घटना घडल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. आपल्या दोन्ही लहान मुलांना विष … Read more

दारूच्या व्यसनाला कंटाळून इसमाची तलावात उडी घेऊन आत्महत्या

वर्धा प्रतिनिधी। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरा लगत असलेल्या पोहचदार बगीच्या जवळील तलावात उडी घेऊन एका ५० वर्षीय इसमान आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या तलावात प्रेत तरंगत असल्याचे नागरीकांच्या लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. दिलीप म्हैसकर असं या इसमाचा नाव आहे. या इसमाचा मृतदेह हा तलावावर तरंगत असल्याचं नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी … Read more

धक्कादायक!! स्वतःच्या किडनीच्या सौद्यात फसगत झाल्याने युवकाने केली आत्महत्या  

अकोला प्रतिनिधी। आपल्या स्वतःच्या किडनीचा सौदा केल्यांनतर संबंधित डॉक्टर कडून फसवणूक झाल्याच्या दडपणात येऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. किडनी प्रत्यारोपणापूर्वीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी डेव्हीड नामक डॉक्टरने या युवकाला २ लाख रुपयांनी फसवले होते. त्याच तणावात युवकाने आत्महत्या केल्याची माहिती सुरुवातीला कळाली आहे. अतुल अजाबराव मोहोड असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून … Read more

मोठी बहीण रागावल्याने मुलीची आत्महत्या, अकस्मात मृत्यूची नोंद

औरंगाबाद प्रतिनिधी। अभ्यास करीत नसल्याने मोठी बहीण रागवल्याची भावना मनात येऊन छोट्या बहिणीने घराजवळील उद्यानातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील हडको एन-11 परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . शिल्पा रामकुमार धनगावकर अस आत्महत्या करणाऱ्या युवतीच नाव आहे. शाळेचा अभ्यास करीत नसल्यान शिल्पाची मोठी … Read more

घरच्यांचा विरोध म्हणून, प्रेमीयुगुलाची आत्महत्या

गोंदिया प्रतिनिधी। गोंदिया जिल्ह्यात सडक अर्जुनी तालुक्यातील कनेरी नाल्यामध्ये प्रेमीयुगलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रेमीयुगलाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संदीप यशवंत कावळे वय २३ तसेच संगीता बोहारे वय १६ असे दोघांची नावे आहेत. याबाबत सविस्तर अशी की, कनेरी नाल्याजवळ प्रचंड दुर्गंध येत असल्याची कुजबुज गावात सुरु असतांना … Read more

प्रेयसीच्या त्रासाने इसमाची गळफास घेवून आत्महत्या

बुलढाणा प्रतिनिधी | प्रेयसी आणि तिच्या नातेवाईकांकडून ब्लॅकमेलिंग केलं जात असल्यामुळं त्यांच्या त्रासाला कंटाळून एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी समोर आली. याप्रकरणी प्रेयसी आणि तिला मदत करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली आहे. विष्णू श्रावण जाधव अस आत्महत्या करणाऱ्या इसमाच नाव आहे. विष्णू हा चटई बनवण्याच काम करत होता. त्याच्या प्रेयसीने त्याला लग्नासाठी गळ … Read more