कोल्हापूरात ऊस दरावरून संघर्षाची ठिणगी !

कोल्हापुरात ऊस दराबाबत कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्यात सुरू असणारी बैठक फिस्कटली आहे. ‘एफआरपी’ चे तुकडे करण्याचा कारणावरून साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेत मतभेद झाल्याने या बैठकीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला आहे. तर २३ नोव्हेंबरला होणाऱ्या ‘स्वाभिमानी’च्या उस परिषदेत अंतिम निर्णय होईपर्यंत जिल्ह्यातील कोणताच साखर कारखाना सुरू करू देणार नसल्याचा गंभीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. 

 ‘सर्वोदय’ कारखाना प्रकरणी जयंत पाटील यांना मोठा धक्का!

प्रथमेश गोंधळे । सांगली प्रतिनिधी कारंदवाडी येथील सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचा राजारामबापू सहकारी कारखान्याशी झालेला करार राज्य शासनाने जानेवारी २०१९ मध्ये बेकायदा ठरवला होता. तो आदेश बदलण्यास आज उच्च न्यायालयाने नकार देत अपील फेटाळले. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार हा करार बेकायदा ठरला असून त्याविरोधात योग्य तेथे पुढील अपील करण्यास उच्च न्यायालयाने मुभा दिली आहे. राजारामबापू … Read more

गडकरी,मुंडेनी कारखान्यात इथेनॉल निर्मिती केली का?: रघुनाथदादा पाटील

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  साखर कारखानदारांना इथेनॉलऐवजी अल्कोहोलमध्ये अधिक रस आहे. मोदींचे सरकारला पाच वर्षे होऊनही इथेनॉलचे धोरण पक्के करता आले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यातील मंत्री सुभाष देशमुख, पंकजा मुंडे यांच्याकडे अनेक कारखाने असतानाही इथेनॉल निर्मितीसाठी दबाव न टाकता केवळ चर्चाच केली जाते. कॉंग्रेस सरकार जाऊन भाजप सरकार आले तरी धोरणात कानामात्राचा … Read more