नेलेत खोडवा ऊसासह कडब्याची गंज जळाली: अज्ञाता विरोधात गुन्हा

सातारा | नेले (ता.सातारा) येथे दोन एकर खोडवा ऊसासह ज्वारीच्या कडब्याची गंज जाळण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत अज्ञाताविरोधात तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या दुर्घटनेत तीन शेतकऱ्यांचे सुमारे 2 ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेले गावच्या उत्तरेकडे असलेल्या … Read more

Video : रयत कारखान्याचा ऊसाने भरलेला ट्रक कालव्यात कोसळला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पसरणी (ता. वाई) येथील भैरवनाथनगर येथे ऊसाची वाहतूक करणारा ट्रक पाण्याने भरलेल्या कालव्यात कोसळला. ही घटना सायंकाळी 6 च्या सुमारास ही घडली. ट्रकचालकाने वेळीच ट्रकमधून उडी घेतली. त्यामुळे जिवितहानी टळली, मात्र ट्रक कालव्यात कोसळल्याने पाणी तुंबून लाखो लिटर पाणी कालव्यातून बाहेर जावून वाया गेले. धोम पाटबंधारे विभागाने तातडीने कालव्यातील पाणीपुरवठा … Read more

चचेगाव येथे शाॅर्टसर्किटमुळे तासाभरात 13 एकर ऊस जळून खाक

कराड | तालुक्यातील चचेगाव येथील देशपांडा शिवारात शाॅर्टसर्किटमुळे 13 एकर ऊस जळाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 12 शेतकऱ्यांच्या ऊस जळाला असून लाखो रूपयांचे नुकसान झाले. जळालेल्या शेतातील ऊसाचा पंचनामा तलाठी तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, चचेगाव गावातील कोळे पाणंद रस्त्यावरील देशपांडा शिवारात  शाॅर्टसर्किटमुळे ऊसाच्या शेताला आग लागली. आग लागल्यानंतर शेतात काम … Read more

राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचा टायर फुटल्याने ऊसाने भरलेली ट्राॅली पलटी

कराड | पुणे- बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर कराड शहराजवळ वारुंजी फाटा येथील उड्डाणपुलावर आज दि.26 रोजी शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास भरधाव ट्रकचा टायर फुटला. ट्रकचा टायर फुटल्याने उसाने भरलेल्या ट्रॅक्टर- ट्राॅलीला जोराची धडक दिल्याने ट्रॉली पलटी झाली. या अपघातात महामार्गावर ऊस पसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती अशी, ऊसवाहतूक करणारा चालक ट्रॅक्टरसह उसाने भरलेल्या … Read more

दोनशे एकर ऊस शेतीला भीषण आग लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे ढवळी येथे दुपारच्या सुमारास दोनशे एकर ऊस शेतीला भीषण आग लागली. यामध्ये शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी वेळीच घरातील नागरिकांना व गोठ्यातील जनावरांना बाहेर काढल्याने जीवितहानी टळली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. ढवळी-वड्डी कुटवाड रस्ता येथील काही शेतकऱ्यांच्या ऊस शेतीला आग लागली. काही क्षणातच ही … Read more

महावितरणाचा गलथान कारभार, शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत15 एकर ऊस जळून झाला खाक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कडेगाव येथील बारा पट्टा परिसरातील सुमारे 15 एकरातील उसाचे फड शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाले. महावितरणच्या गलथान आणि भोंगळ कारभारामुळे अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसातच कारखान्यास सदर ऊस गाळपासाठी जाणार असताना ही घटना भर दुपारी 1 वाजता घडली. दरम्यान येथील स्थानिक शेतकऱ्यांनी आग विजवण्याचे … Read more

पुन्हा दर्शन : किरपेत ऊसात बिबट्या… बांधावर मजूर अन् वनविभाग झोपेत

कराड | कराड तालुक्यातील किरपे येथे दोन दिवसापूर्वी 5 वर्षाच्या मुलावर जीवघेणा हल्ला बिबट्याने केला होता. त्यानंतर या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. परिसरातील लोकांना व ऊसतोड मजूरांना बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. मात्र वनविभागाला बिबट्याचा मागमूस लागत नसल्याने मजूरांसह नागरिकांच्यात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सुस्त वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी कधी जागे होणार आणि बिबट्याचा … Read more

100 एकरातील ऊस आगीच्या भक्षस्थानी, अचानक लागलेल्या आगीमुळे लाखोंचे नुकसान

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे वाळवा -बावची रस्त्यावरील ओढयालगतच्या शेतातील उसाला अचानक लागलेल्या आगीमुळे सुमारे १०० एकरातील ऊस आगीच्या भक्षस्थानी पडूनलाखोरुपयांच्या ऊस पिकाचे नुकसान झाले. ओढयापासून सुमारे ५०० मीटर अंतरावरील मुख्यरस्त्यालगतच्या शेतातील विजेच्या तारांमुळे शॉर्टसर्कीट होऊन खालील ऊसाने पेट घेतला असल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या भागात सर्वत्र ऊसशेती असल्याने गळीतास जाणाऱ्या ऊसाचे मोठे … Read more

वजनातील काटामारी तसेच ऊस तोडीसाठी पैशांच्या मागणीसाठी ‘या’ कारखान्यावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवर असणाऱ्या अथणी तालुक्यातील केंपवाड येथील कारखान्यावर वजनातील काटामारी व तोडीस पैसे घेणे व कारखान्याच्या राखेमुळे द्राक्ष बाग व अन्य पिकांचे नुकसान होत असल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोर्चा काढला, साखर आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली … Read more

दुर्देवी : बनवडीत ऊसाच्या पाचोळ्याच्या आगीत 11 महिन्याच्या चिमकुलीचा भाजून मृत्यू

कराड |  ऊसाच्या फडात पाचोळ्याला आग लागल्यामुळे झोळीत झोपवलेल्या अकरा महिन्याच्या मुलीचा भाजुन दुर्दैवी मृत्यू झाला. बनवडी (ता. कराड) येथे ही घटना घडली. नंदिनी सोमय्या वरवी (रा. निलपाणी, ता. चोपडा, जि. जळगाव) असे भाजून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील एका साखर कारखान्याची ऊसतोड मजुरांची टोळी बनवडी गावात दाखल झाली आहे. … Read more