शिरढोणमध्ये स्वाभिमानीने ऊसतोडी बंद पाडत रोखली वाहने

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ऊसदराचा तोडगा निघाल्याशिवाय गाळप हंगाम करू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देत आज कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोणमधील ऊसतोडी बंद पाडल्या. याशिवाय वांगी येथून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टरची हवा सोडून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली. जिल्ह्यातील काही कारखान्यांनी गाळप सुरु केले असले तरी अद्याप दराचा तोडगा निघालेला नाही. रविवारी कोल्हापुरात स्वाभिमानी … Read more

कोल्हापूरात ऊस दरावरून संघर्षाची ठिणगी !

कोल्हापुरात ऊस दराबाबत कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्यात सुरू असणारी बैठक फिस्कटली आहे. ‘एफआरपी’ चे तुकडे करण्याचा कारणावरून साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेत मतभेद झाल्याने या बैठकीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला आहे. तर २३ नोव्हेंबरला होणाऱ्या ‘स्वाभिमानी’च्या उस परिषदेत अंतिम निर्णय होईपर्यंत जिल्ह्यातील कोणताच साखर कारखाना सुरू करू देणार नसल्याचा गंभीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. 

एफआरपीचे २८१ कोटी रुपये थकित; १ जूनपर्यंत व्याजासह रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलन

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्यातील बाराशे कोटी रुपयांची थकीत असून त्यामध्ये सांगलीतील २८१ कोटी रुपयांचा समावेश आहे. साखर आयुक्तांनी थकित एफआरपी आणि त्याच्यावर १५ टक्के व्याजाची रक्कम तातडीने देण्याचे सूचना दिल्या आहेत. मात्र कारखानदार एफआरपी देण्याच्या तयारीत नसल्याचे दिसते. त्यामुळे १ जूनपर्यंत थकीत एफआरपीची व्याजासह रक्कम न मिळाल्यास ५ जूनपासून साखर आयुक्त कार्यालयासमोर तीव्र … Read more

वायरींगच्या स्पार्किग ने आग लागून ऊसासह ट्रॅक्टर जळून खाक

unnamed file

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे ऊस भरलेल्या ट्रॅक्टर च्या हेड मधील वायरींगमध्ये अचानक बिघाड झाल्याने स्पार्किग होऊन लागलेल्या आगीत टूॅक्टर सह ऊसाने भरलेली ट्रॉली जळून खाक झाल्याची घटना बुधवार १३ फेबुवारी रोजी तालूक्यातील गलबे देवेगाव येथे सकाळी साडेदहा अकराच्या सुमारास घडली. यात शेतकऱ्याच्या ऊसासह ट्रॅक्टरचे ६ लाख २० हजाराचे नुकसान झाले असुन सदरील घटनेचा पंचनामा … Read more