माझ्यावर जी कारवाई करायची आहे ती करा, मी सत्य बोलतच राहीन – प्रियांका गांधी 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या उत्तर प्रदेश सरकारला कोरोना परिस्थिती हाताळण्यास अपयश आले असल्याची टीका केली होती. त्यांच्या वारंवार होणाऱ्या टीकेमुळे भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. याला उत्तर देताना प्रियांका गांधी यांनी आता जी कारवाई करायची आहे ती कर, मी इंदिरा गांधींची नात आहे. असे म्हंटले आहे. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांनी असे जाहीर उत्तर दिले आहे.

‘जनतेच्या सेवकाच्या रूपात उत्तरप्रदेशच्या जनतेप्रतीमाझे कर्तव्य हे आहे की मी त्यांच्यासमोर सत्य ठेवावे. कोणत्याही सरकारी प्रचाराला समोर ठेवणे माझे कर्तव्य नाही आहे. उत्तरप्रदेश सरकार इतर विभागाद्वारे निष्फळ धमक्या देऊन स्वतःचा वेळ वाया घालवत आहे. जी काही कारवाई करू इच्छिता ती करा, मी सत्य समोर ठेवत राहीन. मी इंदिरा गांधींची नात आहे. विरोधी पक्ष नेत्यासारखी भाजपाची अघोषित प्रवक्ता नाही.’  असे ट्विट त्यांनी केले आहे.

 

काही दिवसांपूर्वी इतर राज्यांत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना घरी आणण्यासाठी प्रियांका गांधी यांनी बस गाड्यांची सोय करण्याची तयारी दाखवली होती. यासाठीचा सर्व खर्च काँग्रेस पक्ष करेल असंही गांधी यांनी म्हटलं होतं. मात्र या बसगाड्यांना परवानगी देण्यावरुन उत्तर प्रदेश सरकार आणि प्रियांका गांधी यांच्यात बराचकाळ संघर्ष चालला होता. त्यामुळे प्रियांका गांधींनी घेतलेल्या सडेतोड भूमिकेवर भाजपा नेते काय प्रतिक्रीया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment