हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज भारतीय क्रिकेटसाठी खास दिवस आहे. याचनिमित्ताने त्या संघातील माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी Helo अॅपवर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अयाझ मेमन यांच्यासोबतलाईव्ह येत ऐतिहासिक आठवणींना उजाळा दिला. त्या काळात भारतीय संघ हा तेवढा महत्त्वाचा संघापैकी नव्हता. आमच्यापैकी अनेकजण संघात नवखे होते. तेव्हा क्रिकेटमध्ये फक्त दिग्गज खेळाडूंच्या संघाला सन्मान दिला जायचा. भारताने जेव्हा फायनलमध्ये प्रवेश मिळवला आणि आम्हाला वाटले आम्ही विश्वचषक जिंकू शकतो.
जेव्हा नाणेफेक जिंकलो त्याआधी फलंदाजी निवडायचा निर्णय घेतला होता. १९८३ विश्वचषकाने सर्व भारतीयांचा क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला होता. भारताने त्याकाळात विश्वचषकाचे मार्केटिंग सुरु केले होते. आजही त्याकाळातील खेळाडूंची तुलना कोणाशीही करता येणार नाही. कारण त्याकाळात खेळाडू हे परिस्थितीशी झगडून सामने खेळत होते. आजही ही आम्ही सर्व खेळाडू एका व्हॉटस्अप ग्रुपवर कनेक्ट आहोत.
मदन लाल यांनी त्याकाळातील पत्रकारितेचीदेखील स्तुती केली. आणि त्याचप्रमाणे आजच्या पत्रकारांना चपराकदेखील लावली. विश्वचषकातील अनेक किस्से त्यांनी या लाईव्हमध्ये सांगितले. भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलण्यासाठी १९८३ चा विश्वचषक फार महत्त्वाचा होता. आजदेखील तो दिवस भारतात सुवर्णदिवस म्हणून साजरा केला जातो. त्याकाळात भारतात अणिबाणीची परिस्थिती असताना लोकांना थेट प्रेक्षपण पाहता येत नव्हते, तरी भारतीयानी संपूर्ण संघाला पाठिंबा दिला आणि तो विश्वचषक आम्ही जिंकलो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.