हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय युझर्स आता चीनचे स्मार्टफोन आणि त्यांनी तयार केलेल्या अॅप्सवर बहिष्कार घालण्याची तयारी करत आहेत. चीनने बनवलेल्या मोबाईल फोनबरोबरच त्यांचे मोबाईल अॅप्लिकेशन्स आणि अशी अनेक उत्पादने आहेत जी भारतात खूप लोकप्रिय आहेत. तसे पाहिले तर भारत हा चीनसाठी एक खूप मोठी फायदेशीर बाजारपेठ आहे. बर्याच वेळा, जेव्हा मोबाईल फोनवर एखादे अॅप्लीकेशन इन्स्टॉल केले जाते, तेव्हा त्याच्या अॅक्सेससाठी अनावश्यक अशी माहिती देखील विचारली जाते, ज्याचा त्या अॅप्लीकेशनशी काहीही संबंध नसतो. काही गुप्तचर संस्थांचे असे म्हणणे आहे की, हे अॅप्स सुरक्षित नाहीत आणि ते युझर्सचा सगळा डेटा हा भारताबाहेर स्टोअर करत आहेत. त्यामुळे, सर्वांत पहिल्यांदा आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे की असे चीनी अॅप्स कोणकोणते आहेत, त्यानंतर कोणते अॅप्स युझर्सना कोणत्या प्रकारचे नुकसान पोहोचवू शकतात. चला तर मग आपण पाहूयात…
हे आहेत चिनी अॅप्स – SHAREit, SHEIN, TikTok, UC Browser, UC News, Clean Master – Cheetah, Bigo Live, Bigo Video, Virus Cleaner, hello, Baidu Translate, Beauty Plus, Cache Clear DU studio, Clash of Kings, ClubFactory, CM Browser, DU Battery Saver, DU Browser, DU Cleaner, DU Privacy, DU recorder, ES File Explorer, Kwai, LIKE, Mail Master, Mi Community, Mi स्टोअर, Mi Video call-Xiaomi, QQ Player, QQ Security Centre , यांबरोबरच आणखीही बरेच चिनी अॅप्स आहेत.
या प्रकारचे नुकसान – एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की SHAREit, TikTok, UC Browser, Bigo Live, Bigo Video सारखे बरेच अॅप्स आपला कॅमेरा, गॅलरी आणि मायक्रोफोन अॅक्सेस करण्यासाठी माहिती विचारतात. त्यानंतर, ते युझर्सचा डेटा चोरतात आणि चायनाच्या टेलिकॉम कंपनीकडे किंवा त्यांच्या मूळ कंपनीकडे पाठवतात. एवढेच नव्हे, तर युझर्सचा डेटा विदेशी संस्थांकडे ट्रांसफर करतात, असा दावाही अहवालात करण्यात आला आहे.
या अॅप्समध्ये लोकेशन मागितले जाते – बर्याच वेळा युझर्सना त्यांच्या लोकेशनचा अॅक्सेस देणे जरुरीचे असते मात्र ते केवळ कॅब सर्व्हिस, फूड डिलिव्हरी किंवा ऑनलाइन शॉपिंग यांसारख्या कंपन्यांसाठी. अशी काही चिनी अॅप्स आहेत जी युझर्सच्या लोकेशन शिवाय कोणत्याही आवश्यकतेबद्दल विचारतात. त्याशिवाय अॅपवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. अर्का कन्सल्टिंगच्या सह-संस्थापक असलेल्या शिवांगी नाडकर्णी म्हणाल्या की, UC Browser युझर्सकडे लोकेशन अॅक्सेससाठी विचारतो जेणेकरुन ती व्यक्ती कोठून सर्च करत आहे हे शोधू शकेल.
दरम्यान, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी भारतीय सरकारला ५२ चीनी मोबाइल अॅप्स ब्लॉक करण्यास सांगितले असून लोकांनाही ते वापरू नका असे आवाहन करण्यात आलेले आहे, असे एका अहवालात समोर आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.