हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ६ एप्रिलपर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग भारतातील जवळपास अर्ध्या जिल्ह्यात पसरला आहे. बहुतेक प्रकरणे हि मुंबई आणि नवी दिल्लीसह देशातील सर्वाधिक प्रभावित १० जिल्ह्यांमधील आहेत.इंडिया टुडे डेटा इंटेलिजेंस युनिट (डीआययू) ला आढळले की ६ एप्रिल पर्यंत देशातील एकूण ७२७ जिल्ह्यांपैकी कोरोना विषाणू ३३० जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. भारतात कोविड -१९च्या संसर्गाची पुष्टी झालेल्या घटनांची संख्या ५,००० च्या पुढे गेली आहे, तर मृतांचा आकडा १४० वर गेला आहे.
६ एप्रिल रोजी संध्याकाळपर्यंत मुंबईत सर्वाधिक ४२६ प्रकरण नोंदले गेले. त्यानंतर हैदराबाद आणि कासारगोड (केरळ) जिल्ह्यांचा नंबर येतो. देशात असे २३८ जिल्हे आहेत जिथे प्रकरणाची संख्या १० पेक्षा कमी आहे. त्याचबरोबर ५७ जिल्ह्यात ही संख्या १० ते ५० आहे.
मुंबई, हैदराबाद, कासारगोड, इंदूर, पुणे, चेन्नई आणि नवी दिल्ली यासारख्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये अशी अनेक डझनभर जिल्हे आहेत जिथे देशातील एकूण प्रकरणांपैकी ४० टक्क्यांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.देशभरात २१ दिवस लॉकडाउन लागू आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउन दोन आठवड्यांसाठी वाढवता येऊ शकेल. मात्र, सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.
आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की लॉकडाऊन वाढविणे कोविड -१९ च्या उद्रेक पातळीवर अवलंबून असेल.कोरोनाव्हायरसचा संसर्ग चीनच्या वुहान शहरातून पसरला.तेथे पहिल्या रुग्णाची नोंद हि डिसेंबर अखेरीस झाली. जगातील कोरोनाव्हायरसमध्ये १.४ दशलक्षाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे आणि ७८,००० हून अधिक लोक मरण पावले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.