कुत्र्याला दुचाकीला बांधून नेले फरपटत; आदित्य ठाकरेंकडून प्रकरणाची गंभीर दखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | दोन विकृतांनी कुत्र्याला दुचाकीला बांधून दूर पर्यंत फरफटत नेल्याचे प्रकार घडला आहे. हे कृत्य एका व्हायरल व्हिडिओतुन समोर आले आहे. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 जून रोजी दुपारी चार वाजता तिरुपती वॉशिंग सेंटर अजबनगर येथे हा प्रकार घडला. याची एका एनजीओने दखल घेऊन पोलिस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पाच जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास दोन आरोपींनी दुचाकीला कुत्रा बांधला रस्त्याने दुचाकी सुरुवातीला हळू चालवली. परंतु नंतर जोरात पळविली. कुत्रा पाठीमागे फरफटत राहिला.. कुत्रा फरफटत असल्याचे लक्षात आल्यानंतरही दुचाकीस्वारांनी क्रूरपणे त्याला तसेच सोडले. त्याच वेळी तिथे उपस्थित नागरिकांनी त्याचा व्हिडिओ बनविला.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही त्याची गंभीर दखल घेतली आहे. हा व्हिडिओ औरंगाबादचा असल्याचे समजल्यानंतर त्यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांना हा विडिओ पाठवून ट्विट करीत हळहळ व्यक्त करून कारवाईचे आदेश दिले. पालकमंत्र्यांनी या घटनेची दखल घेतल्यानंतर सामाजिक संस्था समोर आल्या. त्यांनी तक्रार दिल्यावर क्रांती चौक पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 कलम अकरा व भादवि कलम 34 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.