हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणतीही आपत्ती आली की सुरक्षेसाठी सर्वप्रथम उभा राहणारा घटक म्हणजे पोलीस होय. कोणत्याही सार्वजानिक उत्सवाच्या वेळी, राष्ट्रीय सणाच्या वेळी आपले कुटुंब, आपला आनंद सारे काही बाजूला ठेवून ते बंदोबस्तात उभे असतात. नागरिकांच्या सेवेसाठी सतत तत्पर असणारा सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य पाळणारा हा वर्ग Covid -१९ च्या लढाईत सुरुवातीपासून ढाल बनून उभा आहे. तेलंगणाचे आयपीएस महेश भागवत यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये एक सैन्याधिकारी बंदोबस्तात असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला मिठाई चा बॉक्स देऊन त्यांचे कौतुक करत आहेत. आणि सैन्याला ही पोलिसांवर अभिमान असल्याचे सांगत आहेत.
या व्हिडीओत हे सैन्याधिकारी म्हणतात, ” सगळ्यात महत्वाचे म्हणजे संपूर्ण जगाला भारतीय पोलिसांचा गर्व आहे. कोरोना विषाणूचे संकट सुरु झाल्यापासून देशभरातील पोलीस दिवसरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. देशातील सर्व समस्यांच्या वेळी तुम्ही नेहमी उभे राहता. लोकसंख्या नियंत्रण, ट्राफिक नियंत्रण असो किंवा गुन्हेगारी नियंत्रण असो आपण कायम उत्तम काम केले आहे. सगळा देश कोरोना ला घाबरून घरी बसला होता तेव्हा तुम्ही रस्त्यावर होता. आणि म्हणूनच सैन्यालाही तुमच्यावर गर्व आहे. तुमचा अभिमान आहे.”
https://www.instagram.com/p/CAcAuxgjRa23lSPrn5hKP-E1qUovu6a2Y7VGSA0/
देशभरात बंदोबस्तात असणाऱ्या अनेक पोलिसांना या विषाणूची लागण झाली आहे. काहींना जीवही गमवावा लागला आहे. मात्र पोलीस यंत्रणा जनसुरक्षेसाठी तैनात आहे. आयपीएस महेश भागवत यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओ मध्ये अशा सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक ते सैन्याधिकारी करीत आहेत. कोरोनाच्या लढाईतील पोलिसांची भूमिका महत्वपूर्ण आहे. नागरिकांकडून नकारात्मक प्रतिसाद येऊनही ते मात्र न डगमगता आपले काम करत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.