हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (धुळे प्रतिनिधी) | कोरोना रुग्णांची संख्या ही गेल्या काही दिवसांपासून अचानक वाढू लागली असल्यामुळे धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा,शिरपूर आणि धुळे या ठिकाणी कुलूपबंद केलेली कोविड सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोमवारी एकूण ४५ जणांचे अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत तर मंगळवारी ६५ अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही १५२८२ एवढी झाली आहे. म्हणून तपासणी आणि निदान तत्काळ व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने कुलूपबंद असलेले कोविड पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
सुरवातीला रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे आम्ही काही सेंटर बंद केली होती. पण आम्ही ती आता पुन्हा सुरू करतोय. तसेच कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून विशेष लक्ष पुरवण्यात येत आहे. नागरिकांनी देखील सतत मास्क वापरावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच सूरक्षा नियमांचे सतत पालन करावे. अशी प्रतिक्रिया धुळ्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.