नवी दिल्ली | जगभरात भारतीय खेळांचा डंका वाजवण्यासाठी सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आयआयटी बॉम्बेच्या सहकार्याने हे मंत्रालय आता गेमिंग सेंटर बनवणार आहे. हे सेंटर खेळाच्या विकासासाठी महत्त्वाच्या योजना आणि कोर्स चालू करणार आहे. केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी(28 फेब्रुवारी) गेम डिझायनिंग कॉम्पिटिशन च्या सहभागी लोकांना ऑनलाइन संबोधित करताना, ही माहिती दिली.
गेम डिझायनिंग कॉम्पिटिशन यामध्ये सहभागी लोकांशी ऑनलाइन संबोधित करत असताना प्रकाश जावडेकर म्हणाले की, भारत हे खेळाचे एक केंद्र आहे. भारताच्या खेळाची दुनिया मोठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला प्रमुख खेळ निर्माता देश बनवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. यामुळे सर्व भारतीय मोदींचे स्वप्न हे आपले स्वप्न समजून काम करतील. आणि सर्व नागरिक, हे स्वप्न साकार करायला मदत करतील.
केंद्रीय मंत्र्यांनी माहिती देताना सांगितले की, आयआयटी मुंबईच्या सहयोगाने केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालय एक गेमिंग सेंटर बनवणार आहे. सेंटरमध्ये ॲनिमेशन सारख्या विषयांवरती वेगवेगळे कोर्सेस चालू केले जाणार आहेत. सोबतच, वेगवेगळ्या सेंटरमध्ये खेळांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातील. या माध्यमातून भारतीय खेळ हे जगभराच्या खेळा सोबत टक्कर देऊ शकतील. आणि भारताच्या सांस्कृतिक विरासतीचे पुनरुत्थान होऊन पूर्ण जगामध्ये भारतीय खेळण्यांचे राज्य निर्माण होऊ शकणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.