हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मानवी चाचणीत सामील असलेली व्यक्ती आजारी पडल्यानंतर AstraZeneca आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या Oxford covid-19 Vaccine या लसीला थांबविण्यात आले आहे. या वृत्तामुळे अमेरिकन व युरोपियन शेअर बाजारामध्ये मोठी घसरण दिसून आली. अमेरिकेच्या शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक डाऊन जोन्स मंगळवारी 632 अंकांनी खाली आला. त्याच वेळी टेक्नोलॉजी शेअर्सचे नस्डॅकचे निर्देशांक 4 टक्क्यांहून अधिकने खाली आले आहे. या संकेतांचा परिणाम आज देशांतर्गत शेअर बाजारावरही होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये जोरात घसरण होऊ शकते.
आशियाई बाजारात प्रचंड घसरण
अमेरिकेच्या शेअर बाजाराच्या घसरणीमुळे आशियाई बाजारात जोरदार विक्री दिसून येत आहे. जपानचा बेंचमार्क इंडेक्स निक्केई 1.50 टक्क्यांनी घसरून 22922 पातळीवर आला आहे. चीनचा बेंचमार्क इंडेक्स शंघाई 1.30 टक्क्यांनी घसरून 3273 च्या पातळीवर आला.
भारतावर याचा मोठा परिणाम होईल
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चीन आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे आधीच भारतीय बाजारावर दबाव आहे. आता या बातमीमुळे जोरदार घसरण होण्याची शक्यता आहे. तथापि, क्रूडच्या किंमती खाली आल्याने एक चांगली बातमी मिळाली आहे.
AstraZeneca याबाबत म्हणाले की, हा एक रूटीन व्यत्यय आहे, कारण चाचणीमध्ये सामील झालेल्या व्यक्तीच्या आजाराबद्दल अजूनही काहीही समजलेले नाही. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या या लसीच्या चाचणीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. सध्या जगभरात डझनभर ठिकाणी कोरोना लसीची चाचणी सुरू आहे, पण ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी चाचणी आघाडीवर असल्याचे तज्ञांचे मत आहे.
ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोरोना विषाणूच्या लसीची चाचणी दुसऱ्यांदा थांबविण्यात आली आहे. मोठ्या चाचण्यांमध्ये हे अगदी सामान्य आहे आणि जेव्हा जेव्हा एखाद्या चाचणीत सामील झालेल्या एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले जाते आणि त्याच्या आजाराचे कारण लगेच माहित होत नसते तेव्हा चाचण्या थांबविल्या जातात. मात्र येत्या काही दिवसांत चाचण्या पुन्हा सुरू होतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”