पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार पार 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे जिल्हयात आज एकूण १७३३ स्वॅब संकलित करण्यात आले होते. यापैकी २०८ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले आहेत आणि याबरोबरच पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४१०७ इतकी झाली आहे. पैकी १६९८ प्रकरणे सध्या कार्यान्वित आहेत. यापैकी ४४ रुग्ण हे व्हेंटिलेटर वर आहेत तर १२५ रुग्ण आयसीयू मध्ये आहेत. आज पुण्यातील १५९ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्हयात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी ७१२ समूह कार्यरत आहेत ते दररोज जास्तीत जास्त लोकांना भेटून त्यांचे सर्वेक्षण करीत आहेत. आज दिवसभरात १,१४,६०,४५१  लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. एकूण ३३, ८७,९८५ घरांपर्यंत पोहोचण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.

 

जिल्ह्यात आज एकूण ७ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण २२७ रुग्ण मृत्यू पावले आहेत. दरम्यान कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत तसे बरेही होत आहेत. आतापर्यन्त जिल्ह्यतील २१८२ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात संचारबंदीचे नियम काही ठिकाणी हळहळू शिथिल केले जात आहेत. जिथे रुग्ण वाढत आहेत अशा परिसरात संचारबंदी तशीच राहण्याची शक्यता आहे.

Pune

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.