हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेड झोन मधून आलेल्या एका व्यक्तीची होम क्वारंटाईनमध्ये घरी जाऊन दाढी करणे एका न्हाव्याला महागात पडले आहे. हि घटना सिंहभूम जिल्ह्यातील बागबेडा परिसरातील आहे. जिल्हा प्रशासनाने त्या दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. जिल्हा प्रशासनाने सांगितले कि, त्या व्यक्तीने होम क्वारंटाईनच्या नियमांचे उल्लंघन केलेले आहे. आणि त्या न्हाव्याला हे माहिती असूनही कि ती व्यक्ती बाहेरून आली आहे त्याच्या घरी दाढी बनवण्यासाठी गेला. त्यामुळे दोघां विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तो व्यक्ती हृदयरोगाचे उपचार घेऊन दिल्लीहून नुकताच त्याच्या घरी परतला होता. रात्री उशिरा करण्यात आलेल्या चाचणीमध्ये न्हाव्यामध्येही कोरोनाचे संक्रमण आढळून आलेले आहे. प्रशासनाला माहिती मिळालाय आहे कि त्या न्हाव्याने आणखी ७० जणांची दाढी केलेली आहे. यामुळे बागभेदाच्या सीपी तोला आणि प्रधान तोला येथे एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांपैकी १४ जणांची ओळख काढून त्यांना सरकारी क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे, तर बाकीच्यांचा घेणे अद्यापही सुरूच आहे. कोरोनाच्या संक्रमणाची चाचणी करण्यासाठी आता त्यांचे नमुने घेण्यात येत आहेत.
यादरम्यानच दिल्लीहून आलेल्या व्यक्तीला बारीडीह येथील मर्सी हॉस्पिटलमध्ये नेलेल्या टेम्पो चालकालाही सरकारी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेले आहे. न्हावाच्या संपर्कात आलेल्या सर्व जणांचा तपास घेणे सध्या सुरूच आहे. मिळालेल्या बाकी सर्वांचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठविले जात आहेत. जिल्हा उपयुक्त रविशंकर शुक्ल यांनी सांगितले आहे, लोकांना होम क्वारंटाईनच्या नियमांचे सक्तीने पालन करावे लागेल. थोडाही बेजबाबदारपणा लोकांना कोरोनाच्या संसर्गाला आमंत्रण देणारे ठरेल. यावेळी त्यांनी लोकांना सोशल डिस्टंसिंग राखण्याचे तसेच सक्तीने फेस मास्क घालाण्याचे आणि सॅनीटायझर वापरण्याचे आवाहन केलेले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.