नागरिकांनी ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, जिल्हाधिकारी चव्हाण यांनी साधला फेसबूक लाइव्हद्वारे संवाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. औरंगाबाद जिल्हा देशातील सर्वाधिक बाधित जिल्ह्यांच्या यादीत पहिल्या दहामध्ये आहे, ही जिल्ह्यासाठी चिंताजनक बाब आहे.

याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोरोनावर कसा अटकाव आणता येईल, काय उपाययोजना कराव्या लागतील, नागरिकांनी कशी काळजी घेतली पाहिजे, अशा अनेक मुद्द्यावर आज फेसबूक लाइव्हमध्ये माहिती दिली.

जिल्हाधिकारी फेसबूक लाईव्हमध्ये बोलताना म्हणाले की, सध्या शेजारच्या काही जिल्ह्यांत लॉकडाऊन आहे पण आपल्याकडे अजून लावला गेला नाही, कारण लॉकडाऊनचा परिणाम थेट सर्वसामान्यांवर भयानक असणार आहे.

सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, विनाकारण बाहेर पडू नये, नियमांचं पालन करावं. हा लढा आपल्याला मिळून लढायचा आहे. औरंगाबादमधील बरीच कुटुंबे येथील उद्योगधंद्यावर चालतात, जर जिल्ह्यात लॉकडाऊन लावलं तर सामान्यांपासून सर्वांचे हाल होण्याची शक्यता आहे. पण प्रशासन उद्योगधंद्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घेईल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

Leave a Comment