हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यभर कोरोना विषाणूचा संसर्ग हा पुन्हा एकदा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय.बऱ्याच ठिकाणी नाइट कर्फ्यू, लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे, या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारने प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्रावर फोडू नये, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका विधानाचा देखील चांगलाच समाचार घेत त्याला उत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार म्हणाले होते की “केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला जीएसटीची थकबाकी आलेली नाही. त्याचा परिणाम अर्थसंकल्पावर होऊ शकतो.यावर पाटील म्हणाले की राज्य सरकारने जबाबदारी झटकू नये. प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्र सरकार फोडू नये, प्रत्येक गोष्टीला केंद्र सरकारचं जबाबदार नाहीये. बऱ्याच गोष्टी या राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात. विद्यमान सरकारनं आधी त्याचा नीट वापर करावा आणि मग केंद्राला सल्ला द्यावा.
तसेच केंद्रीय अर्थ मंत्रालयाने देशातील २८ राज्ये व तीन केंद्र शासित प्रदेशांना जीएसटी परताव्याची रक्कम वितरित केली आहे. यापैकी महाराष्ट्राला मिळालेली जीएसटीची रक्कम ही दुसऱ्या क्रमांकाची आहे. त्याचप्रमाणे २०१९-२० मध्ये केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक जीएसटी परताव्याची रक्कम देण्यात आली आहे, असा दावा देखील पाटील यांनी यावेळी बोलताना केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.