औरंगाबाद प्रतिनिधी | चारचाकी मधून आलेल्या चोरट्यानी रस्त्याने जाणाऱ्या एका 62 वर्षीय वयोवृद्धच्या गळ्यातील साडेचार टोळ्यांची सोनसाखळी हिसकवली एवढेच नाही तर त्या वृद्धाला सुमारे 20 ते 25 फूट फरपटत नेले ही धक्कादायक घटना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास सिडको एन-5 परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे वाढत्या मंगळसूत्र चोरीच्या घटना पाहता पोलीस आयुक्तालायकडून चोरांची पद्धत जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे या घटनेत दुचाकी ऐवजी कार चा वापर केल्याने पोलिसांनी पद्धत जाहीर करताच चोरांनी मोडस बदलली की काय अशी चर्चा सुरू आहे.
विष्णू चित्ते असे वृद्धाची नाव आहे. सकाळी समान आणण्यासाठी गेले असता रस्त्याने घरी येत जात असताना तेथे एका पांढऱ्या रंगांची चारचाकी त्यांच्या जवळ आली, चारचाकी मधील चोरांनी वृद्धाला रस्ता विचारात तीन मिनिटे संवाद साधला व त्यानंतर अचानक त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकवली व त्यांना फरपटत नेले. व काही क्षणातच कुणालाही काही कळण्याच्या आतच चारचाकी मधील चोरटे तेथून पसार झाले.
फरपटत नेल्याने वृद्धांच्या गळ्यावर, हात-पायाला मार लागला होता. ही सर्व घटना परिसरातील एका सीसीटीव्ही मध्ये कैद झाली.या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात दुपार पर्यन्त गुन्हा दाखल झालेला न्हवता अशी माहिती सिडको पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच सिडको, डी. बी.पथक, आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनस्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली असता सीसीटीव्ही मध्ये चारचाकीचा क्रमांक अस्पष्ट दिसत असल्याने पोलिसा समोरील अडचण वाढली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.