नवी दिल्ली । वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात चांदीच्या आयातीमध्ये 96 टक्के घट झाली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या महिन्यात केवळ 11.28 टन चांदीची आयात झाली आहे. जे पूर्वीच्या तुलनेत 96 टक्के कमी आहे. 2019 मध्ये चांदीची एकूण मागणी 5,598 टन होती, तर 2020 मध्ये (जानेवारी ते सप्टेंबर) 1,468 टन चांदी आयात केली गेली. अशा परिस्थितीत चांदीच्या आयातीत अचानक घट होण्यामागे अनेक कारणे असल्याचे मानले जात आहे.
चांदीच्या घटीमागे कोरोनाची साथ ‘हे’ एक मोठे कारण बनले आहे
संपूर्ण जगाबरोबरच भारतही यावेळी कोरोना साथीशी झगडत आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत यावेळी बाजारात चांदीची कमी मागणी आहे. त्याचबरोबर स्क्रॅप मार्केटद्वारेही जुनी चांदी बाजारात आल्यामुळे मागणी आणि पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.
दरमहा 300 टन चांदी स्क्रॅप मार्केटमध्ये येत आहे
उद्योग मंत्रालयाच्या मते गेल्या वर्षी देशात चांदीचा स्क्रॅप शून्य होता, परंतु यावर्षी दरमहा सुमारे 300 टन चांदी स्क्रॅपच्या रूपात बाजारात येत आहे. त्याचबरोबर हिंदुस्तान झिंक दरमहा 40-50 टन चांदी बाजारात विकत आहे. दुसरीकडे, 2011 मध्ये चांदीमध्ये गुंतवणूक करणारी लोकं आता वाढत्या दरामुळे चांदीची विक्री करुन चांगला नफा कमवत आहेत.
रिपोर्ट्सनुसार, MCX मधील चांदीची किंमत 77 हजारांच्या वर पोहोचली
MCX मधील चांदीची किंमत 77949 रुपये प्रति किलोवर पोहोचल्यामुळे लोकं बाजारात त्यांच्या घरात ठेवलेली चांदी विकत आहेत. या विक्रीमुळे आयत देखील कमी झाली आहे. जर चांदीचे दर कमी असतील तर त्याच्या आयातीमध्ये उडी दिसून येईल. सणासुदीच्या हंगामात चांदीच्या मागणीत वाढ दिसून येईल. अहवालानुसार चांदीची अंदाजे आयत यावर्षी 3200 ते 3500 टन आहे. जो मागील वर्षाच्या तुलनेत 40 टक्के कमी आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.