नवी दिल्ली । एप्रिलपासून सॅलरी, पीएफ आणि कर्मचार्यांच्या ग्रॅच्युएटीचे नियम बदलणार आहेत. केंद्र सरकार नवीन नुकसानभरपाईचे नियम लागू करण्याची योजना आखत आहे, त्यामुळे कंपन्यांच्या बॅलेंसशीट मध्ये बदल दिसून येतील.
या नव्या नियमांमुळे कर्मचार्यांची सॅलरी स्लीप, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युएटी, हातात येणाऱ्या पगाराचे नियम बदलतील.
हे नियम गेल्या वर्षी संसदेत पास केलेल्या वेज कोडचा एक भाग आहेत. वेतनश्रेणीची नवीन व्याख्या पुढील आर्थिक वर्षापासून सुरू होणार आहे. या नियमांमध्ये भत्त्याची मर्यादा निश्चित केली जाईल. ते एकूण पगाराच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त असणार नाही.
ईटीच्या वृत्तानुसार, या नियमांनंतर कंपनीची बहुतेक पे स्ट्रक्चर बदलले जाईल. कर्मचारी आणि कंपनी या दोघांच्या पीएफ योगदानामध्ये वाढ होईल. पीएफ योगदानाची वाढ अनेक अधिकाऱ्यांचे पगार कमी करू शकते.
रिटायरमेंटनंतर ग्रॅच्युइटीचे प्रमाण वाढेल. ग्रॅच्युइटीचे कॅलक्युलेशन हे बेसिक सॅलरीवर आधारित आहे. याशिवाय पीएफच्या योगदानात वाढ आणि ग्रॅच्युइटीचे अधिक पेमेंट यामुळे कंपन्यांची कॉस्ट वाढू शकते.
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, ही नवीन व्याख्या पे स्ट्रक्चरमध्ये बदल करेल. अनेक प्रकरणांमध्ये, भत्ता जास्त ठेवला जातो आणि सोशल सिक्योरिटी कॉन्ट्रिब्यूशन कमी केले जाते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.