नवी दिल्ली । टिकटॉक (Tiktok) ची मूळ कंपनी असलेल्या बाईटडन्स (ByteDance) ने भारतात आपला व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली आहे. गुडगाव येथील कंपनीने आता आपला व्यवसाय जवळपास बंद केला आहे. भारतात टिकटॉक आणि हॅलो अॅप्सची मालकी असणार्या या कंपनीवरील सेवांवरील निर्बंध कायम आहेत. टिकटॉकची जागतिक अंतरिम प्रमुख व्हेनेसा पाप्पस आणि जागतिक व्यवसाय समाधानाची उपाध्यक्ष ब्लेक चांडली यांनी कर्मचार्यांना ई-मेल पाठवून याची माहिती दिली आहे.
कंपनीने ई-मेल द्वारे पाठवली माहिती
कंपनीने या निर्णयाची माहिती टीमला दिली असून या निर्णयाचा परिणाम भारतातील सर्व कर्मचार्यांवर होणार आहे. अधिकाऱ्यांनी कंपनीच्या भारतात परतण्याविषयी अनिश्चितता व्यक्त केली. पण ते म्हणाले की,”येत्या काळात हे घडेल अशी अशा आहे. आम्ही कधी भारतात परतणार आहोत हे आम्हाला देखील ठाऊक नाही, आम्ही आमच्या लवचिकतेवर विसंबून आहोत आणि येणाऱ्या काळात तसे करण्याची इच्छा आहे,” असे ईमेल मध्ये म्हटले आहे.
टाऊन हॉलमध्ये दिली माहिती
बाईटडन्सच्या एका सूत्रानुसार, कंपनीने बुधवारी टाऊन हॉल आयोजित केले, जिथे त्यांनी भारतातील व्यवसाय बंद करण्याविषयी सांगितले होते. याबाबत टिकटॉकच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,”कंपनी 29 जून 2020 रोजी जरी केल्या गेलेल्या भारत सरकारच्या आदेशांचे पालन करत आहे.”
प्रवक्त्याने पुढे सांगितले की, “हे निराशाजनक आहे की, गेल्या सात महिन्यांत आम्ही अनेक प्रयत्न करूनही आमचे अॅप पुन्हा कधी सुरू केले जाऊ शकेल याविषयी आम्हाला स्पष्ट मार्गदर्शन दिले गेले नाही. आम्हांला हा खेद आहे की, भारतात आमच्या 2,000 हून अधिक कर्मचार्यांना अर्ध्या वर्षापासून राखून ठेवल्यानंतर आता आमची कामगार संख्या कमी करण्याशिवाय पर्याय नाही. ”
58 अॅप्सवर बंदी घातली जाऊ शकते
भारत टिकटॉकसहित आणखी 58 चिनी अॅप्सवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची तयारी करीत आहे. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (Meity) भारतात या अॅप्सवर कायमस्वरुपी बंदी (Ban) आणण्यासाठी नव्याने नोटीस बजावली आहे. बंदी घातल्या जाणार्या अॅप्सपैकी टिकटॉकसहित आणखी 58 अॅप्सचा समावेश आहे. हेच कारण आहे की, बाईटडन्स देखील भारतातून आपले कामकाज बंद करत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.