हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस परदेशात आणि भारतातही वेगाने पसरत आहे. बहुतेक देश या साथीशी अजूनही संघर्ष करीत आहेत. त्याचबरोबर, जगभरात त्याच्या उपचारासाठी प्रभावी औषध तसेच लस विकसित करण्याचे काम चालू आहे. या सर्वा व्यतिरिक्त, अशा काही पद्धती आहेत ज्या कोरोना विषाणूने संक्रमित झालेल्या लोकांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास वाढवून कोरोनाशी लढण्याची शक्ती देतात. मिझोरममधील कोविड केअर सेंटरमध्ये सध्या अशीच एक अनोखी पद्धत अवलंबली जात आहे. त्याचे नाव टिकटॉक थेरपी आहे.
याच्या नावानेच हे सूचित होते आहे की, ही टिकटॉक थेरपी म्हणजे व्हिडीओच्या सहाय्याने रूग्णांचा आत्मविश्वास वाढविला जाणे. इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, लाँगलाई जिल्ह्यात कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टरांकडून ही टिकटॉक थेरपी रूग्णांना उत्साहित ठेवण्यासाठी वापरली जात आहे. यात, कोरोनाचे डॉक्टर आणि लक्षणे नसलेले रुग्ण एकमेकांना डान्सचे चॅलेंज किंवा टिकटॉक चॅलेंज देतात. भलेही टिकटॉक वर बंदी घालण्याची मागणी होऊ देत मात्र या माध्यमातून इथल्या रुग्णांमध्ये उत्साह कायम ठेवण्याचा एक व्यायाम चालू आहे. यामुळे रुग्णही खूश होत आहेत.
या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या एका 18 वर्षीय रूग्णाने सांगितले की, ‘जेव्हा पहिल्यांदा माझ्या फोनवर डॉक्टरांच्या डान्सचा व्हिडिओ मी पाहिला तेव्हा मला समजले की ते त्यांच्यासाठी नाही आहे. मात्र आम्ही त्यांचे चॅलेंज मंजूर केले. त्याच वेळी, कोविड केअर सेंटरच्या 31 वर्षीय वैद्यकीय अधिकारी डॉ. एल्सादाई लालबरसायमा म्हणाल्या की,’ कदाचित या सर्व गोष्टींच्या शेवटी मी एक चांगली डान्सही बनू शकते.
मिझोरमच्या लांगलाई जिल्ह्याची पश्चिम सीमा बांगलादेश आणि म्यानमारच्या दक्षिण सीमेशी जोडलेली आहे. दोन आठवड्यांपूर्वीच या जिल्ह्यात कोरोना विषाणूची लागण होण्याची पहिली घटना घडली होती. डॉ. एल्सदाई लालबरसायमा यांनी त्यावेळी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. ते डॉक्टर, नर्स आणि रूग्णांसाठी होते. या माध्यमातून प्रत्येकामध्ये माहितीचा प्रसार केला जातो. उदाहरणार्थ, औषध घेण्याची आणि व्यायामाची वेळ सांगितले जाते. त्यांच्या मते, येथे दाखल केलेले सर्व-नॉन-लाक्षणिक रुग्ण हे दिल्लीहून परत आले होते. वैद्यकीय माहिती व्यतिरिक्त हळू हळू फनी स्टीकर आणि नंतर टिकटॉक व्हिडिओदेखील या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पाठवण्यात आले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ‘आम्ही डॉक्टरांनी असा निर्णय घेतला होता की आम्ही सर्वांनी टिकटॉकच्या माध्यमातून आमचे डान्स व्हिडिओ बनवून ग्रुपमध्ये टाकू आणि रूग्णांनाही असे करण्यास सांगू. अगदी टिकटॉक चॅलेंज सारखे.’
या सेंटरमध्ये दाखल झालेल्या एका 18 वर्षीय रूग्णाने सांगितले की,’ तो ऑन स्पॉट डान्स मूव्हजवर विचार करतो. नंतर ते रेकॉर्ड करतो आणि ग्रुपवर पाठवतो. त्याचबरोबर, लाँगलाई जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जोथानपरी यांनी सांगितले की,’ जिल्हा रुग्णालयच सध्या कोविड केअर सेंटर म्हणून कार्यरत आहे, येथे फक्त एक 11 वर्षांचे मूल आहे आणि इतर सर्व रुग्णांचे वय हे 18 ते 30 च्या दरम्यान आहे. ते सर्व रुग्ण तरुण आणि उत्साही आहेत. आम्हाला असा विश्वास आहे की, ही थेरपी त्यांना कनेक्ट ठेवण्याचा एक चांगला मार्ग आहे. त्यांच्या मते हे केवळ शक्य झाले आहे कारण इथल्या रूग्णांची संख्या कमी आहे आणि त्यापैकी कोणीही गंभीर आजारी नाही आहे.
डॉ एल्सदाई लालबरसायमा आणि त्यांची टीम जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करतात. ते म्हणतात की,’ रूग्णांसह डॉक्टरांनीही तणावापासून दूर राहण्यासाठी आणि मानसिक दृष्ट्या सपोर्ट करण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.