Aadhaar मध्ये नाव, पत्ता आणि DoB अपडेट करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील हे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । UIDAI ने आधार कार्डधारकांना महत्वाची सूचना दिली आहे. आपल्याला जर आधार कार्डवरील घराचा पत्ता किंवा जन्मतारीख अपडेट करायची असेल  तर आपल्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. UIDAI च्या मते, आपण आधारमध्ये नाव, पत्ता आणि जन्मतारीख अपडेट करण्यासाठी वापरत असलेले कोणतेही डॉक्युमेंट हे आपल्या नावावरच असले पाहिजेत. यासाठी आपल्याला कोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता असेल ते जाणून घ्या-

UIDAI ने केले ट्विट

आधार जारी करणारी संस्था UIDAI ने आपल्या ट्विटमध्ये याबद्दलची माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, जर आपल्याला आधारमध्ये आपले नाव, पत्ता किंवा जन्मतारीख अपडेट करायची असेल तर आपण वापरत असलेले डॉक्युमेंट आपल्या नावावर आहे आणि ते वैध आहे याची खात्री करा.

हा डॉक्युमेंट स्वीकारला जातो

यूआयडीएआयच्या म्हणण्यानुसार, ते आधारमधील Proof Of Identity साठी 32 प्रकारचे डॉक्युमेंटस स्वीकारतात. Proof Of relationship साठी 14 डॉक्युमेंटस स्वीकारतात, DOB साठी 15 तर  Proof of Address (PoA) साठी 45 डॉक्युमेंटस स्वीकारतात. यासाथीच्या डॉक्युमेंटसची लिस्ट चेक करा.

Proof Of Identity (PoI)

> पासपोर्ट

> पॅन कार्ड

> रेशन कार्ड

> मतदार ओळखपत्र

> ड्रायव्हिंग लायसन्स

Proof of Address (PoA)

> पासपोर्ट

> बँक स्टेटमेंट

> पासबुक

> रेशन कार्ड

> पोस्ट ऑफिस अकाउंट स्टेटमेंट

> मतदार ओळखपत्र

> ड्रायव्हिंग लायसन्स

> वीज बिल

> पाण्याचे बिल

https://t.co/VuPeU9v2Zv?amp=1

DOB Documnets

> जन्म प्रमाणपत्र

> पासपोर्ट

> पॅन कार्ड

> मार्क शीट्स

> SSLC बुक/सर्टिफिकेट

> कोणतेही वैध डॉक्युमेंटस नसतील तर ते कामाला येतील.

https://t.co/bEkySUmUFP?amp=1

यूआयडीएआयच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांचे स्वत: च्या नावावर कोणतीही वैध कागदपत्रे नाहीत, ते आधार नोंदणी / नाव, पत्ता, जन्मतारीख अपडेट करण्यासाठी यूआयडीएआय कडून अप्रूव स्टॅंडर्ड सर्टिफिकेट वापरू शकतात. सर्टिफिकेट ग्रुप A आणि B गॅझेटेड अधिकारी / ग्रामपंचायत प्रमुख किंवा प्रमुख / खासदार / आमदार / एमएलसी / नगरसेवक / तहसीलदार / मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे प्रमुख किंवा अधीक्षक किंवा वॉर्डन किंवा मॅट्रॉन / संस्था मान्यताप्राप्त शेल्टर होम किंवा अनाथाश्रम च्या प्रमुखांकडून जारी केले जाणे आवश्यक आहे.

https://t.co/GsmZRVUKIr?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment