हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ झाल्यानंतर आज त्या वाढत्या किमतीला पुन्हा ब्रेक लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये बुधवारी सोन्याच्या दर प्रति दहा ग्रॅम 600 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाले आहेत. त्याचवेळी, एक किलो चांदीची किंमत ही 3000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीने खाली गेली. अमेरिकन डॉलरमध्ये आलेल्या जोरदार मजबुतीमुळे परदेशी बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या 99.9 टक्के शुद्धतेची किंमत प्रति दहा ग्रॅम प्रति 53,674 रुपयांवरून 54,856 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली होती, त्या दरम्यान दर दहा ग्रॅमच्या किंमती 1,182रुपयांनी वाढल्या. त्याचबरोबर मुंबईतील 99.9 टक्के सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 53384 रुपयांवर गेली.
सोन्याची नवीन किंमत
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार बुधवारी दिल्ली सराफा बाजारातील 99.9 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याची किंमत घटून ते प्रति 10 ग्रॅम 54,909 रुपयांवरून 54,269 रुपयांवर आले. या काळात पती 10 ग्रॅमच्या किंमती या 640 रुपयांनी खाली आल्या आहेत. त्याचबरोबर मुंबईतील 99.9 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 53424.00 रुपयांवर आली आहे.
चांदीच्या नवीन किंमती
बुधवारी सोन्यापेक्षा चांदीच्या किंमती खाली आल्या आहेत. दिल्लीत एक किलो चांदीची किंमत 72,562 रुपयांवरुन 69,450 रुपयांवर आली आहे. या काळात 3,112 रुपयांची जोरदार घसरण झाली आहे. त्याचबरोबर मुंबईतील चांदीचा दर हा प्रति किलो 67135 रुपयांवर आला आहे.
आता काय होईल?
कोटक सिक्युरिटीजने एका नोट मध्ये म्हटले आहे की सोन्यातील अस्थिरता खूप जास्त आहे आणि ती सुरूच राहू शकते. अमेरिकन मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्वच्या काही मिनट्सवर गुंतवणूकदारांची नजर आहे. फेडचे मिनट्स हे बुधवारी उशिरा जाहीर होतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.