सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर शहरात पोलिसांच्या प्रतिमेला गालबोट लावणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रवाशांकडून दोन ट्राफिक पोलीस चिरीमिरी (bribe) घेत असल्याची घटना उघडकीस आली आहे. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सत्यता तपासून संबंधित जे कोणी अधीकारी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
सोलापुरात ट्राफिक पोलिसांनी स्वीकारली लाच, घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद pic.twitter.com/uFe0VQHoeX
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) October 11, 2022
काय आहे नेमके प्रकरण?
छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका वाहन चालकाला तिथे उपस्थित असलेल्या दोन ट्राफिक पोलिसांनी थांबविले. नियमांचा भंग केल्याप्रकरणी चलनाची माहिती दिली. मात्र, शेवटी चिरीमिरी (bribe) घेऊन या वाहन चालकाला सोडून देण्यात आलं. आपल्याला कोणी पाहू नये यासाठी हात मागे घेत या पोलिसांनी चिरमिरीची रक्कम स्वीकारली. हा सगळा प्रकार त्या ठिकाणी असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा भ्रष्टाचार (bribe) थांबवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक विभागात मोठे बदल केले आणि वाहतूक विभागाचा कारभार ऑनलाईन झाला. मग डिजीटल स्वरुपात ग्राहकाच्या घरी पावती जायला लागली, पैसेही थेट वाहतूक विभागाच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली. मात्र अजूनही ट्राफिक विभागातील काहीजण चिरीमिरी (bribe) घेत असल्याचे निदर्शनास येत आहे.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती