कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सुर्ली, ता. कराड येथील बस स्टॉपवर एकजण गावठी पिस्तूल बाळगून असणार्या एकास सातारा एलसीबीच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. त्याच्याकडून गावठी पिस्टल व 3 जीवंत काडतुसे असा 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच त्याच्याकडे ज्याने पिस्टल ठेवण्यास दिले तोही गंभीर गुन्ह्यात फरार असल्याचे समजले. त्यानंतर दुसर्या संशयितासही वांगी, जि. सांगली येथून पोलिसांनी अटक केली. अमोल जगन्नाथ माने, वय 32 रा. वनवासमाची ता.कराड, संभाजी संपत मदने, रा. बनवडी कॉलनी, ता. कराड (फरार) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, सुर्ली, ता. कराड येथील बसस्टॉप जवळील परिसरामध्ये एकजण गावठी पिस्टल बाळगलेल्या स्थितीत फिरत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. यानंतर या पथकाने सुर्ली, बसस्टॉप येथे दि. 6 रोजीचे सायंकाळी 5.25 वा. सुमारास संशयितास पकडून त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्या ताब्यात एक गावठी पिस्टल व 3 जिवंत काडतूस असा एकुण 65 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सदर पिस्टल व काडतूस दुसर्या एकाने त्याच्याकडे ठेवण्यास दिले आहे, असे सांगितले.
या अनुषंगाने खात्री केली असता ज्याने पिस्तूल ठेवण्यासाठी दिले होते, तो संशयित कराड तालुका पोलीस ठाण्यातील खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी नोव्हेंबर 2020 महिन्यापासून फरार असून तो वांगी, जि. सांगली याठिकाणी असल्यासचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याठिकाणी जावून सापळा लावून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. या दोन्हीही आरोपीविरुध्द कराड तालुका पोलीस ठाण्यास भारतीय शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनांप्रमाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, सपोनि आनंदसिंग साबळे, सहायक फौजदार जोतीराम बग, उत्तम दबडे, हवालदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कचरे, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, विक्रम पिसाळ, रवींद्र वाघमारे, मंगेश महाडीक, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे, राजकुमार ननावरे, रोहित निकम, सचिन ससाणे, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, केतन शिंदे यांनी ही कारवाई केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”