नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांकडून नागपूरच्या कन्हान कांद्री परिसरातील डब्लूसीएलमध्ये सुरक्षा दलाच्या जवानावर गोळीबार (fired) करण्यात आला आहे. मिलिंद खोब्रागडे असे गोळीबार (fired) करण्यात आलेल्या जवानाचे नाव आहे. या घटनेत मिलिंद खोब्रागडे हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून दुसऱ्याचा अजून शोध सुरु आहे.
काय घडले नेमके?
सविस्तर माहिती अशी कि, मिलिंद खोब्रागडे हे ज्या ठिकाणी कर्तव्यावर होते. त्या ठिकाणी तिथे दोन व्यक्ती दुचाकीवरून आले. यानंतर मिलिंद खोब्रागडे आणि त्या दोन व्यक्तींमध्ये काही कारणामुळे वाद झाला. हा वाद एवढा वाढला की दुचाकीवरून आलेल्या त्या दोन व्यक्तींपैकी एकाने देशी कट्ट्यातून खोब्रागडे यांच्या दिशेने गोळी (fired) झाडली. हि गोळी मिलिंद खोब्रागडे यांच्या डोक्याला लागली आणि ते गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एक जण पोलिसांच्या ताब्यात
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई (fired) करायला सुरुवात केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी एकाला अटक केली असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे. मिलिंद खोब्रागडे आणि त्या दोन व्यक्तींमध्ये नेमका कशामुळे वाद झाला याचा तपास पोलीस करत आहेत.
हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..