नवी दिल्ली । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली आहे. देशाच्या टोल टॅक्सचे उत्पन्न (Toll Tax Income) सध्या वार्षिक 34,000 कोटी रुपये आहे. 2025 पर्यंत टोलमधून मिळणारी कमाई वार्षिक 1.34 लाख कोटी रुपये होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ‘आता आपल्यासमोर मोठे आव्हान आहे की, आपण या प्रकल्पातून कशी कमाई (Monetization) करणार आहोत. आपण त्याद्वारे पैसे कसे वाढवणार आहोत? त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय आपण अवलंबत आहोत हे महत्वाचे आहे.
‘लीडरशिप समिट 2021’ आणि 14 व्या इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया अवार्ड्स (ICAI Awards) मध्ये गडकरी म्हणाले की,” चार्टर्ड अकाउंटंट्स हे आपल्या अर्थव्यवस्थेचे इंजिन आहेत. सध्या NHAI ची आर्थिक स्थिती खरोखरच चांगली स्थितीत आहे. सध्याच्या टोल टॅक्समधून मिळणारे उत्पन्न वर्षाकाठी 34,000 कोटी रुपये आहे आणि 2025 पर्यंत आपले वार्षिक उत्पन्न 1.34 लाख कोटी असेल.” ते पुढे म्हणाले की,” भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. वित्तपुरवठ्यासाठी आता देशाला विविध प्रकारचे नवे प्रयोग करण्याची गरज आहे.”
देशाच्या विकासासाठी अधिक परकीय गुंतवणूकीची गरज आहे
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की,”आपली एकूण यंत्रणा डिजिटल आहे. मला खात्री आहे की, आपल्याला देशाच्या विकासासाठी परकीय गुंतवणूकीची गरज आहे.” ते म्हणाले की,” धोरणनिर्मितीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम विकसित केले जाणे आवश्यक आहे, ज्याद्वारे आपल्याला देशात अधिक थेट परकीय गुंतवणूक (FDI) मिळू शकेल.” गडकरी म्हणाले की,”सामाजिक-आर्थिक बदल (Socio-Economic Changes)) आणि दारिद्र्य निर्मूलन ही मोठी आव्हाने आहेत, परंतु नवे फंडिंग मॉडेल, नवीन तंत्रज्ञान आणि संशोधन कौशल्यांनी ज्ञानाचे संपत्तीमध्ये रुपांतर करणे शक्य आहे.”
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.