महाराष्ट्रातून युपीला सायकलवर चालला होता; वाटेत चक्कर येऊन पडल्याने झाला मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्रातून एक व्यक्ती सायकलवरून घराकडे जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बरवानी येथे या माणसाचा मृत्यू झाला.हा व्यक्ती भिवंडी, महाराष्ट्र येथून उत्तर प्रदेशला रवाना झाला होता.बरवानीचे एसडीएम जी धनगड यांनी सांगितले की, ‘तो बेशुद्ध अवस्थेत सापडला होता त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतिक्षा आहे.

२५ मार्चपासून सुरू झालेले लॉकडाउन आता १७ मे पर्यंत सुरु राहणार आहे,त्यादरम्यान बरेच लोक मरण पावले आहेत जे त्यांच्या घरी परत जात होते. यातील अनेक लोक रस्त्यात अपघातात ठार झाले तर काहींचा वाटेत असतानाच मृत्यू झाला. अलीकडेच, उत्तर प्रदेशच्या श्रावस्ती येथील रहिवाशाचा आपल्या गावी पोहोचल्याच्या ४ तासानंतर मृत्यू झाला.

Indian Railways converts old train cars into coronavirus ...

स्थलांतरितांसाठी गाड्या सुरु
लॉकडाऊन सध्या तिसऱ्या टप्प्यात असून सरकारने स्थलांतरितांना त्यांच्या घरी नेण्यासाठी विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. तत्पूर्वी, लॉकडाऊनचा पहिला टप्पा २५ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान होता जो पुढे वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला.एक मे रोजी, गृह मंत्रालयाने आपत्ती अधिनियम २००५ अंतर्गत ४ मे ते १५ मे या कालावधीत लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्पा सुरु करण्याबद्दल माहिती दिली. शनिवारी देशात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढून १,२१८ झाली आणि संसर्गाच्या घटनांची संख्या ३७,३३६ वर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की या साथीच्या आजाराने संक्रमित २६,१६७ रुग्णांवर देशात उपचार केले जात असून ९,९५० लोक पूर्णपणे स्वस्थ झाले आहेत.एक रुग्ण हा देशाबाहेर गेला आहे. या प्रकरणांमध्ये एकूण १११ विदेशी नागरिकांचा सहभाग आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.